यावेळची भारत-पाकिस्तान मॅच खूपच खतरनाक झाली होती. पाकिस्तानच्या तोंडातला घास भारताने हिसकावला आणि जो काही जल्लोष झाला तो अवघ्या जगाने पाहिला. गुगलचे भारतीय सीईओ देखील वेळात वेळ काढून अख्खी मॅच पाहत होते. या मॅचमध्ये काही गंमतीशीर प्रसंगही घडले. कोणी अर्धा-अर्धा टीशर्ट घातला तर कोणी उलटा झेंडा पकडला...
पाकिस्तानी चाहता प्रेक्षकांत एकटाच पाकिस्तानी झेंडा हवेत फडकवत उभा होता. यावेळी दुसऱ्या बाजुला मागे बसलेल्या काही भारतीय चाहत्यांनी त्याला आवाज देऊन अरे उलटा झेंडा पकडलायस,,, असे सांगण्याचा प्रयत्न केला. आजुबाजुच्या आवाजामुळे त्याला ते लवकर ऐकू गेले नाही. जेव्हा ऐकू गेले तेव्हा त्याने त्याची चूक सुधारली आणि झेंडा नीट केला. याचा व्हिडीओ या तरुणांनी काढला होता. त्याने य़ा तरुणांना थम्प्सअपही केले.
यानंतर भारतीयांनी एक टॉन्ट मारला. झेंडा पकडता येत नाहीय आणि यांना म्हणे काश्मीर पाहिजेय... त्यानंतर तिथे जोरदार हास्याचे फवारे उडाले. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. लोकांनी सोशल मीडियावर लिहिले की एक तर पाकिस्तानची इतकी वाईट स्थिती झाली आहे, आता त्यांना अशा गोष्टीही पाहायला मिळत आहेत.
अर्धी अर्धी जर्सी घालून फॅन पोहोचला...मेलबोर्नच्या स्टेडिअममध्ये एका असा फॅन पोहोचला होता, ज्याने अर्धी जर्सी भारताची घातलेली तर अर्धी पाकिस्तानची. त्याला असे का केले असे विचारले असता, त्याने माझी पत्नी पाकिस्तानची असून मी भारतीय आहे. आणि अमेरिकेहून मी ऑस्ट्रेलियाला भारताला सपोर्ट करण्यासाठी पोहोचलो आहे, असे त्याने सांगितले. 'मेरी बीवी पाकिस्तानी, पर दिल है हिंदुस्थानी', असे या व्यक्तीने सांगितले. पत्नीने परवानगी दिलीय त्यामुळेच मी हा शर्ट घातला आहे, असेही तो पुढे म्हणाला.