IND vs PAK, T20 World Cup 2023: जेमिमा रॉड्रिग्जचे (Jemimah Rodrigues) अर्धशतक (नाबाद ५३) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष (नाबाद ३१) (Richa Ghosh) सोबतच्या दमदार भागीदारीमुळे भारताने रविवारी ICC Women's T20 World Cup 2023 सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एक षटक आणि सात गडी राखून पराभव केला. भारताच्या या विजयामुळे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे मन खूप आनंदित झाले. त्याने ट्विटरवर महिला संघाचे कौतुक करणारा एक विशेष संदेश लिहिला, ज्यामध्ये त्याने संघाचा आपल्याला किती अभिमान आहे हे सांगितले.
विराटने ट्विटमध्ये लिहिले की, 'आमच्या महिला संघाने पाकिस्तानच्या संघाविरुद्ध दबावातही शानदार कामगिरी केली आणि आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. आमची टीम प्रत्येक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करत आहे. आमच्या संपूर्ण पिढीला येणाऱ्या काळात खेळण्यासाठी हा संघ प्रेरित करत आहे. विराटव्यतिरिक्त, फिरकी गोलंदाज आर अश्विननेही भारतीय संघाचे कौतुक केले. त्याने लिहिले, 'भारतीय संघाने आव्हानाचा अतिशय छान पाठलाग केला. जेमिमा आणि रिचाने चांगली कामगिरी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका रोमांचक सामन्यातही भारतीय संघ अतिशय शांत आणि संयमी होता.'
--
सामन्यात नक्की काय घडले?
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १४९ धावा केल्या. कर्णधार बिस्मा महारूफने ५५ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. तर आएशा नसीम हिने २५ चेंडूत धडाकेबाज नाबाद ४३ धावा ठोकल्या. भारताकडून राधा यादवने २१ धावांत २ बळी टिपले. भारतीय संघाने १९ षटकात हे आव्हान पार केले. जेमिमा रॉड्रीग्जने ३८ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. तर शफाली वर्माने २५ चेंडूत संयमी ३३ धावांची खेळी केली. रिचा घोषने अखेर २० चेंडूत नाबाद ३१ धाव करून जेमिमाच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला.
आता भारताला आता आपला पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे.
Web Title: Ind vs Pak T20 World Cup 2023 Virat Kohli praises Indian womens cricket team against Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.