India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी पहिला सराव सामना आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतोय.. सूर्यकुमार यादव व लोकेश राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेत ऑसींना मोठे यश मिळवून दिले आणि त्यानंतर कर्णधार अॅरोन फिंचने दमदार फटकेबाजी केली. दरम्यान भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू ब्रिस्बेन स्टेडियमवर पोहोचले. २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आणि त्याचा अभ्यास करावा यासाठी खेळाडू स्टेडियमला उपस्थित होते. दुखापतीतून सावरणारा शाहिन शाह आफ्रिदी याने भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने काही टिप्स घेतल्या.
विराट कोहलीसोबत फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर स्टार झाली 'अमीषा'; व्हायरल झाले 'Hot' फोटो
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून सुरू होणार आहे. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आजम अँड टीमने भारताला प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे २३ तारखेला मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा अँड टीमची कामगिरी कशी होते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. IND vs PAK यांच्यातील लढतीची लाखभर तिकिटं विकली गेली आहेत आणि हा खूप मोठा सामना होईल, यात शंका नाही.
MS Dhoniमुळे पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात भीती बसलीय, म्हणून... ! वासीम अक्रमने व्यक्त केली नाराजी
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर.अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग, मोहम्मद शमी. स्टँडबाय खेळाडू- श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस राऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जमां स्टँडबाय खेळाडू- मोहम्मद हारिस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहानी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"