Join us  

IND vs PAK, T20 World Cup : MS Dhoniमुळे पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात भीती बसलीय, म्हणून... ! वासीम अक्रमने व्यक्त केली तीव्र नाराजी 

India vs Pakistan T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 8:48 AM

Open in App

India vs Pakistan T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून सुरू होणार आहे. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आजम अँड टीमने भारताला प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे २३ तारखेला मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा अँड टीमची कामगिरी कशी होते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. IND vs PAK यांच्यातील लढतीची लाखभर तिकिटं विकली गेली आहेत आणि हा खूप मोठा सामना होईल, यात शंका नाही. आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचे पारडे नेहमी पाकिस्तानवर भारी ठरलेले आहे. २००७ च्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली भारताने जेतेपदाचा षटक उंचावला होता. त्या फायनलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात घर करून बसलेली भीती आजही कायम आहे.

२००७च्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात साखळी गटाचा सामना बरोबरीत सुटला होता आणि त्यानंतर बोल्ड आऊटमध्ये धोनीच्या चतुराईच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला. अंतिम सामन्यात पुन्हा दोन्ही संघ समोरासमोर आले. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिसबाह-उल-हक भारताच्या जेतेपदाच्या मार्गात उभा राहिला. ६ चेंडूंत १३ धावांची गरज असताना धोनीने चेंडू जोगिंदर सिंगच्या हाती सोपवला. पहिला चेंडू Wide टाकल्यानंतर मिसबाहने दुसरा चेंडू षटकार खेचला. ४ चेंडू ६ धावा हव्या असताना मिसबाहने शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने स्कूप मारला आणि एस श्रीसंथने झेल घेत त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. मिसबाहचा हा इनोव्हेटीव्ह शॉट पाकिस्तानला महागात पडला  आणि भारताने ५ धावांनी वर्ल्ड कप जिंकला.

मिसबाहकडून घडलेल्या या चूकीची पाकिस्तानी खेळाडूंनी धास्ती घेतलीय आणि म्हणूनच त्यांचे फलंदाज प्रयोग करताना दिसत नाहीत. पाकिस्तानचा माजी गोलंदाज वासीम अक्रम याने एका कार्यक्रमात पाकिस्तानी फलंदाज फटके मारण्यात विविध प्रयोग करत नसल्यावर नाराजी व्यक्त केली. त्याच कार्यक्रमात मिसबाह उपस्थित होता आणि त्याने २००७च्या वर्ल्ड कप फायनलनंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात भीती बसल्याचे मान्य केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानमिसबा-उल-हकवसीम अक्रम
Open in App