Join us  

IND vs PAK, T20World Cup : टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूसाठी आमची रणनीती तयार; मुख्य फलंदाजाची माघार तरीही Babar Azamची डरकाळी

India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या महा मुकाबल्याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि आता अवघे काही तासच उरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 6:40 PM

Open in App

India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या महा मुकाबल्याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि आता अवघे काही तासच उरले आहेत. मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी चाहते अजूनही जोशातच आहेत. दोन्ही संघांच्या सराव सत्रासाठीही मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने आव्हान देण्यापेक्षा मैदानावर चांगली कामगिरीसाठी प्रयत्न करून असेच संकेत दिले. पण, बाबर आजमने ( Babar Azam) भारतीय संघाला आव्हान दिलेच.

IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा सामना कसा करायचा? सचिन तेंडुलकरचा भारताला मोलाचा सल्ला

मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने १० विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आशिया चषक २०२२ स्पर्धेत दोन्ही संघ दोन वेळा समोरासमोर आले आणि १-१ अशी बरोबरी राहिली. IND vs PAK सामन्यात सूर्यकुमार यादव हा X Factor ठरेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. सूर्यकुमारचा सध्याचा फॉर्म हा बराच बोलका आहे आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमला सूर्याला रोखण्याचा सल्ला दिलाय. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने नुकताच नावावर केला. 

''केवळ सूर्यकुमार यादवला रोखण्याचाच नव्हे, तर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूसाठी आम्ही रणनीती आखली आहे. ठरलेली रणनीती मैदानावर योग्य पद्धतीने राबवली तर आम्हाला विजयापासून कुणी रोखू शकत नाही,''असा दावा बाबरने केला. पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी म्हणजे शान मसूद हा उद्याचा सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचे बाबरने सांगितले. मोहम्मद रिझवानने मारलेला चेंडू मसूदच्या डोक्यावर आदळला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते. मात्र, त्याचवेळी फखर जमान याला दुखापतीमुळे उद्याची लढत खेळता येणार नसल्याचे बाबरने सांगितले. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजम
Open in App