India vs Pakistan, T20WorldCup : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे... क्रिकेट हा खेळ आश्चर्यचकित करणारा आहे. पण, कालचा आश्चर्याचा धक्का दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरला... एकासाठी तो सुखद होता, तर दुसऱ्यासाठी नैराश्याचा होता... अंगावर काटा आणणारा क्षण मेलबर्नवर उपस्थित ९० हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला, तर जगभरातील चाहते अजूनही या क्षणात गुंग आहेत... ३१ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी जो खेळ केला, त्याला तोड नाही. पण, म्हणतात ना आनंद सहजासहजी मिळत नाही. २०व्या षटकात ही जोडी तुटली अन् सर्व जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. त्यात No Ball रामायण, फ्री हिटवरील तीन धावा याने वातावरणे चांगलेच तापले.
No Ball, Free hit, 3 Runs! भारताला चिटर म्हणणाऱ्या पाकिस्तानला ICC ने तोंडावर आपटलं, नियमच दाखवलाविराट मात्र शांत होता.. त्याचं ध्येय ठरलं होतं. पण, स्ट्राईक त्याच्याकडे नव्हती... २ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने घाई केली अन् स्टम्पिंग झाला. आर अश्विनने चतुरानेईन Wide जाणारा चेंडू सोडला, पण धाकधुक होतीच... बाबर आजमने सर्व खेळाडूंना ३० यार्डाच्या आत बोलावले अन् अश्विनने मिड ऑनला पाकिस्तानी खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू चौकार खेचला अन् जल्लोष सुरू झाला. विराटने आधी आकाशाकडे बोट दाखवले नंतर खेळपट्टीवर बसून मुक्का आदळला... सूर्यकुमार, हार्दिक, भुवी मैदानावर धावले. रोहितने तर चक्क विराटला खांद्यावर उचलून घेतले. विराट, हार्दिकच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचेही नवे रुप सर्वांना पाहायला मिळाले.