Join us  

IND vs PAK, T20WorldCup : No Ball, Free hit, 3 Runs! भारताला चिटर म्हणणाऱ्या पाकिस्तानला ICC ने तोंडावर आपटलं, नियमच दाखवला

India vs Pakistan, T20WorldCup : अक्षर पटेलचा रन आऊटचा निर्णय, भारताच्या डावातील NO Ball आणि फ्री हिटचा चेंडू यष्टींवर आदळल्यानंतर विराट कोहलीने घेतलेल्या ३ धावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 10:06 AM

Open in App

India vs Pakistan, T20WorldCup : अक्षर पटेलचा रन आऊटचा निर्णय, भारताच्या डावातील NO Ball आणि फ्री हिटचा चेंडू यष्टींवर आदळल्यानंतर विराट कोहलीने घेतलेल्या ३ धावा... भारत-पाकिस्तान सामन्यात बरंच काही थरारक घडलं. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले.. आता भारताचं काही खरं नाही असंच वाटत असताना विराटने त्याचा क्लास दाखवला... सोबतीला हार्दिक पांड्या होताच. या दोघांच्या शतकी भागीदारीने सामन्याचा कलाटणी दिली. पण, खरा थरार २०व्या षटकात पाहायला मिळाला...

Virat Kohli अखेरपर्यंत भिडला, विजयानंतर रडला; रोहित शर्माने खांद्यावर उचलून घेतला, Emotional Photo

हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला ६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. 

आज पप्पा जीवंत असते तर... ! वडिलांच्या आठवणीने गहिवरला Hardik Pandya, ऑन एअर लहान मुलासारखा रडला

नियम काय सांगतो?

MCC च्या नियमानुसार चेंडू जेव्हा यष्टीरक्षक किंवा गोलंदाजाच्या हातून निसटतो आणि तो चौकार जातो तेव्हा तो डेड बॉल जाहीर केला जातो. फ्री हिटवर केवळ चार प्रकारेच फलंदाज बाद होऊ शकतो... हाताने चेंडू रोखल्या, बॅटने चेंडूला दोनवेळा मारल्यास, क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यास आणि रन आऊट... त्यामुळे विराटचा त्रिफळा उडाल्यानंतरही त्या ३ धावा बाय म्हणून भारताला देण्यात आला. त्यानंतर २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ विकेट्सने सामना जिंकला.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीविराट कोहली
Open in App