IND vs PAK, T20WorldCup : ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! शेवटच्या ६ चेंडूंत काय घडलं, Virat Kohliनं सांगितलं, Video 

India vs Pakistan, T20WorldCup :  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:24 PM2022-10-24T12:24:03+5:302022-10-24T12:24:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK, T20WorldCup : R Ashwin use his own extra head... not listening to me! What happened in the last 6 balls, Virat Kohli told, Video  | IND vs PAK, T20WorldCup : ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! शेवटच्या ६ चेंडूंत काय घडलं, Virat Kohliनं सांगितलं, Video 

IND vs PAK, T20WorldCup : ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! शेवटच्या ६ चेंडूंत काय घडलं, Virat Kohliनं सांगितलं, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan, T20WorldCup :  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे... क्रिकेट हा खेळ आश्चर्यचकित करणारा आहे. पण, कालचा आश्चर्याचा धक्का दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरला. ३१ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी जो खेळ केला, त्याला तोड नाही. पण, म्हणतात ना आनंद सहजासहजी मिळत नाही. २०व्या षटकात ही जोडी तुटली अन् सर्व जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. 

२ धावा, अश्विन स्ट्राईकवर अन्...! भारतीय डग आऊटमध्ये तणावाचं वातावरण, Rahul Dravid चं कधी न पाहिलेलं रूप, Video 
 

२ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने घाई केली अन्  स्टम्पिंग झाला. आर अश्विन स्ट्राईकवर होता आणि मोहम्मद नवाजने टाकलेला चेंडू Wide जातोय हे हेरून चतुरानेईन तो सोडला, पण धाकधुक होतीच. बाबर आजमने सर्व खेळाडूंना ३० यार्डाच्या आत बोलावले अन् अश्विनने मिड ऑनला पाकिस्तानी खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू चौकार खेचला अन् जल्लोष सुरू झाला. पण, या सहा चेंडूत नेमकं काय घडलं हे विराटने सांगितलं.


 

तो म्हणाला,'तुम्हाला १५-१६च्या रन रेटने धावा करायच्या आहेत. अशात दोन चेंडूंवर दोन धावा आल्या की लोकं अतिउत्साही होऊ शकतात.. त्यानंतर DK ( दिनेश कार्तिक) स्टम्पिंग झाला. त्यानंतर आलेल्या ॲशला ( आर अश्विनला) मी सांगितले की कव्हरच्या वरून मार. पण, त्याने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... तो वाईड बॉल सोडण्याचा निर्णय घेणे, हाही धाडसी निर्णय होता. त्यानंतर परिस्थिती १ चेंडू १ धावा आली आणि मग काय विजयाचा मार्ग मोकळाच झाला...''


शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद  ( ५१) यांच्या खेळीने पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार याद व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व  विराट कोहली ( ८२*) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला अन् भारताचा विजय पक्का केला.  
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs PAK, T20WorldCup : R Ashwin use his own extra head... not listening to me! What happened in the last 6 balls, Virat Kohli told, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.