India vs Pakistan, T20WorldCup : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे... क्रिकेट हा खेळ आश्चर्यचकित करणारा आहे. पण, कालचा आश्चर्याचा धक्का दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरला. ३१ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी जो खेळ केला, त्याला तोड नाही. पण, म्हणतात ना आनंद सहजासहजी मिळत नाही. २०व्या षटकात ही जोडी तुटली अन् सर्व जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली.
२ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने घाई केली अन् स्टम्पिंग झाला. आर अश्विन स्ट्राईकवर होता आणि मोहम्मद नवाजने टाकलेला चेंडू Wide जातोय हे हेरून चतुरानेईन तो सोडला, पण धाकधुक होतीच. बाबर आजमने सर्व खेळाडूंना ३० यार्डाच्या आत बोलावले अन् अश्विनने मिड ऑनला पाकिस्तानी खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू चौकार खेचला अन् जल्लोष सुरू झाला. पण, या सहा चेंडूत नेमकं काय घडलं हे विराटने सांगितलं.
तो म्हणाला,'तुम्हाला १५-१६च्या रन रेटने धावा करायच्या आहेत. अशात दोन चेंडूंवर दोन धावा आल्या की लोकं अतिउत्साही होऊ शकतात.. त्यानंतर DK ( दिनेश कार्तिक) स्टम्पिंग झाला. त्यानंतर आलेल्या ॲशला ( आर अश्विनला) मी सांगितले की कव्हरच्या वरून मार. पण, त्याने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... तो वाईड बॉल सोडण्याचा निर्णय घेणे, हाही धाडसी निर्णय होता. त्यानंतर परिस्थिती १ चेंडू १ धावा आली आणि मग काय विजयाचा मार्ग मोकळाच झाला...''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"