IND vs PAK T20WorldCup : भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या T२० विश्वचषक २०२२ मधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ४ विकेट्सनी धूळ चारली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 03:13 PM2022-10-24T15:13:29+5:302022-10-24T15:14:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK T20WorldCup Relive the thrill of the India-Pakistan match in just 5 minutes and 25 seconds Thrilling video | IND vs PAK T20WorldCup : भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video

IND vs PAK T20WorldCup : भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेट प्रेमींनी रविवारी (२३ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या T२० विश्वचषक २०२२ मधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ४ विकेट्सनी धूळ चारली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत विराटने ४ षटकार आणि ६ चौकारांची आतशबाजी केली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट जवळपास १५४.७२ एवढा होता. या संपूर्ण सामन्याचा थरार आपल्याला केवळ ५ मिनिट आणि २५ सेकंदाच्या व्हिडिओतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

जगभरातील चाहते अजूनही या क्षणात गुंग -
काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे कठीण आहे. क्रिकेट हा खेळ आश्चर्यचकित करणारा खेळ आहे. पण, कालचा आश्चर्याचा धक्का दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरला. एकासाठी तो सुखद होता, तर दुसऱ्यासाठी नैराश्याचा होता. अंगावर काटा आणणारा हा क्षण मेलबर्नवर उपस्थित ९० हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला, तर जगभरातील चाहते अजूनही या क्षणात गुंग आहेत. 

विराट-हार्दिक यांच्या खेळीला तोड नाही -
पाकिस्तानने भारतासमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला भारतीय संघाची भंबेरी उडाली. भारताचे केवळ ३१ धावांतच ४ फलंदाज तंबूत परते. यानंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी जो खेळ केला, त्याला तोड नाही. पण, म्हणतात ना आनंद सहजासहजी मिळत नाही. २०व्या षटकात ही जोडी तुटली अन् सर्व जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. त्यात No Ball रामायण, फ्री हिटवरील तीन धावा याने वातावरणे चांगलेच तापले. 

यातच, २ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने घाई केली अन् तो स्टम्पिंग झाला. आर अश्विनने चतुरानेईन Wide जाणारा चेंडू सोडला, पण धाकधुक होतीच. बाबर आजमने सर्व खेळाडूंना ३० यार्डाच्या आत बोलावले अन् अश्विनने मिड ऑनला पाकिस्तानी खेळाडूच्या डोक्यावरून चौकार खेचला अन् जल्लोष सुरू झाला. विराटने आधी आकाशाकडे बोट दाखवले नंतर खेळपट्टीवर बसून मुक्का आदळला. सूर्यकुमार, हार्दिक, भुवी मैदानावर धावले. रोहितने तर चक्क विराटला खांद्यावर उचलून घेतले. विराट, हार्दिकच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचेही नवे रुप सर्वांना पाहायला मिळाले.

भारत-पाकिस्तान लढतीचा अंगावर रोमांच आणणारा Video -

पाकिस्तानने शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद  ( ५१) यांच्या खेळीच्या जोरात ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार याद व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व  विराट कोहली ( ८२*) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला अन् भारताचा विजय पक्का केला.  


 

Web Title: IND vs PAK T20WorldCup Relive the thrill of the India-Pakistan match in just 5 minutes and 25 seconds Thrilling video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.