India vs Pakistan, T20WorldCup : तोंडचा घास टीम इंडियाने पळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ सध्या स्वतःला दिलासा देण्याचं काम करतोय... मेलबर्नवर भारताने रोमहर्षक विजय मिळवून मागली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील पराभवाची व्याजासहित परतफेड केली. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण, विराट कोहली व हार्दिक पांड्याने पाकिस्तानच्या हातातून सामना खेचून आणला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! ६ चेंडूंत काय घडलं, विराट कोहलीनं सांगितलं
शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद ( ५१) यांच्या खेळीने पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व विराट कोहली ( ८२*) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला अन् भारताचा विजय पक्का केला. ३१ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी जो खेळ केला, त्याला तोड नाही.
Virat Kohli अखेरपर्यंत भिडला, विजयानंतर रडला; रोहित शर्माने खांद्यावर उचलून घेतला, Emotional Photo
२०व्या षटकात ही जोडी तुटली अन् सर्व जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. २ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने घाई केली अन् स्टम्पिंग झाला. आर अश्विन स्ट्राईकवर होता आणि मोहम्मद नवाजने टाकलेला चेंडू Wide जातोय हे हेरून चतुरानेईन तो सोडला, पण धाकधुक होतीच. बाबर आजमने सर्व खेळाडूंना ३० यार्डाच्या आत बोलावले अन् अश्विनने मिड ऑनला पाकिस्तानी खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू चौकार खेचला अन् जल्लोष सुरू झाला.
बाबर आजम काय म्हणाला?
''आपण सर्व लढलो. चांगलो खेळलो... हा पराभव आपल्याला थांबवू शकत नाही. गर्व वाटेल असे खेळलो,'' असे विधान करून पाकिस्तानचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडन याने खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. कर्णधार बाबर आजम यानेही खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण केली. तो म्हणाला, ''सामना खूप चांगला झाला... आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. काही चुका झाल्या, त्यातून शिकायचं आहे. खचू नका. स्पर्धा आताच सुरू झालीय. अजून मोठ्या मॅचेस खेळायच्या आहेत. कोणा एकामुळे आपण नाही हरलो, आपण सर्व हरलो. तुझ्यामुळे हरलो, असं कुणी कुणाला म्हणू नका. एकत्रित राहा. या सामन्यात ज्या चागंल्या गोष्टी झाल्या त्याकडे पाहा.. मोहम्मद नवाज तू निराश होऊ नकोस. तू माझ्यासाठी मॅच विनर होतास आणि राहणार आहेस. खचू नकोस. हा पराभव इथेच सोडून टाक... पुढे आणखी चांगली कामगिरी करायची आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs PAK, T20WorldCup : We win as one and lose as one, Listen what Matthew Hayden, Babar Azam and Saqlain Mushtaq told their players following a heartbreaking loss in Melbourne, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.