ICC ODI World Cup India vs Pakistan Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची सर्वांना प्रतीक्षा होती, तो अखेरीस आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जातोय... भारत-पाकिस्तान यांच्यातला हा महामुकाबला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाहते, मोठ मोठे सेलिब्रेटी आणि खेळाडूंचे कुटुंबिय स्टेडियमवर उपस्थित आहेत. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत तरी पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली खेळी केलेली पाहायला मिळतेय... पण, हा सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीला ( Virat Kohli) त्याची चूक लक्षात आली आणि....
भारत-पाकिस्तान सामना सुरू होताच विराट कोहलीला मैदान सोडावे लागले. खरंतर त्याला त्याची चूक कळली आणि त्यामुळेच तो त्वरीत मैदान सोडला. नाणेफेकीनंतर दोन्ही संघ मैदानावर आले. भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आली. राष्ट्रगीतानंतर काही मिनिटांनी कोहलीच्या लक्षात आले की आपण चुकीची जर्सी घातली आहे. त्याची जर्सी सहकारी खेळाडूंपेक्षा वेगळी होती.
उर्वरित खेळाडूंनी त्यांच्या खांद्यावर तिरंगी पट्ट्या असलेली जर्सी घातली होती, जी या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची अधिकृत जर्सी आहे. तर कोहलीने पांढऱ्या पट्ट्यांची जर्सी घातली होती. त्याच्या हे लक्षात येताच त्याने लगेचच मैदान सोडले आणि विलंब न लावता तो मैदानात परतला तेव्हा त्याच्या खांद्यावरही तिरंगी पट्ट्या होत्या. आजच्या सामन्यात शुबमन गिलचे पुनरागमन झाले आहे. डेंग्यूमुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी इशान किशनला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली.