दुबई, आशिया चषक 2018 : पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. भारताविरुद्धही त्याने संयमी खेळी करून पाकिस्तानला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मात्र, त्याने आपल्या वर्तनाने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी फिरले. त्यानंतर मलिकने कर्णधार सर्फराज अहमदसह 107 धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला. मलिकच्या 78 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 237 धावांचे लक्ष्य उभे केले. या सामन्यात मात्र फलंदाजीपेक्षा त्याच्या वर्तनाने भारतीयांचे मने जिंकली. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मलिकला भारतीय खेळाडू काहीतरी बोलून हाक देत होते आणि तोही तितक्याच नम्रपणे त्यांना प्रतिसाद देत होता.
मलिकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.