INDW vs PAKW: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका; मराठमोळी स्मृती मानधना संघाबाहेर

ind vs pak women: आज महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:56 PM2023-02-12T18:56:04+5:302023-02-12T18:56:41+5:30

whatsapp join usJoin us
ind vs pak women India's vice-captain Smriti Mandhana has been ruled out of the first match due to a finger injury  | INDW vs PAKW: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका; मराठमोळी स्मृती मानधना संघाबाहेर

INDW vs PAKW: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका; मराठमोळी स्मृती मानधना संघाबाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ind vs pak wome world cup 2023 | केपटाउन : आज महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. भारतीय महिला संघ आगामी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच भारताच्या अंडर-19 महिला संघाने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने झाली. आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. मात्र, सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारताला मोठा झटका बसला आहे.  

दरम्यान, मराठमोळ्या स्मृती मानधनाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्याच्यावेळी बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे दुखापतीच्या कारणास्तव स्मृती मानधना पाकिस्तानविरूद्धच्या आजच्या सामन्यातून बाहेर झाली आहे. पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वेस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग. 

ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मानधना (उप कर्णधार), यस्तिका भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्स, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, देविका वैद्य, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा आणि राधा यादव.

विश्वचषकासाठी दोन गट खालीलप्रमाणे - 

  1. गट 1 - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश.
  2. गट 2 - इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: ind vs pak women India's vice-captain Smriti Mandhana has been ruled out of the first match due to a finger injury 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.