Join us  

INDW vs PAKW: भारताची सांघिक खेळी पण पाकची कर्णधार भिडली; अर्धशतक ठोकून दिले तगडे आव्हान

ind vs pak women: आज महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 8:09 PM

Open in App

ind vs pak wome world cup 2023 | केपटाउन : आज महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने सावध खेळी करून धावसंख्येचा आकडा शंभरच्या पार नेला असून भारतासमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दीप्ती शर्माने अवघ्या 10 धावसंख्येवर शेजाऱ्यांना पहिला झटका देत शानदार सुरूवात केली, तर 42 धावा असताना राधा यादवने पाकिस्तानची यष्टीरक्षक फलंदाज मुनीबा अलीला बाहेरचा रस्ता दाखवला. पाक कर्णधार बिस्माह मारूफ हिने नाबाद (68) आणि आयेशा नीशम नाबाद (43) धावा केल्या. या दोघींना वगळता कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 

तत्पुर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शेजाऱ्यांची सुरूवात निराशाजनक झाली. मात्र, कर्णधार बिस्माह मारूफ आणि आयेशा नीशम यांनी डाव सावरला आणि 47 चेंडूत 81 धावांची भागीदारी नोंदवली. पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 149 एवढ्या धावा केल्या. 

भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून सुरूवातीपासून पकड मजबूत केली होती. मात्र, प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार बिस्माह मारूफ आणि आयेशा नीशम (81) यांची भागीदार तोडण्यात भारताला अपयश आले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वेस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग. 

विश्वचषकासाठी दोन गट खालीलप्रमाणे - 

  1. गट 1 - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश.
  2. गट 2 - इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App