रांची : आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होत आहे. पावसाच्या विलंबामुळे उशिराने सामन्याला सुरूवात होत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून नाणेफेक पार पडली आहे. यजमान भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यातून मराठमोळा ऋतुराज गायकवाड एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.
दरम्यान, पावसाच्या विलंबामुळे आजचा सामना 40 षटकांचा होणार असून पहिला पॉवरप्ले 8 षटकांचा असेल. तर दुसरा पॉवरप्ले 24 आणि तिसरा पॉवरप्ले केवळ 8 षटकांचा असणार आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ-शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक पहिला एकदिवसीय सामना - 6 ऑक्टोबर, रांचीदुसरा एकदिवसीय सामना - 9 ऑक्टोबर, लखनौतिसरा एकदिवसीय सामना - 11 ऑक्टोबर, दिल्ली