India vs South Africa 1st ODI Live Updates : भारताला समाधानकारक सुरुवात करता आली नाही. कागिसो रबाडाने भारताला पहिला धक्का देताना शुबमन गिलचा ( ३) त्रिफळा उडवला. वेन पार्नेलने टाकलेला चेंडू शिखर धवनच्या बॅटची किनार घेत यष्टिंवर आदळला अन् भारताला ८ धावांवर दुसरा धक्का बसला. धवनने ४ धावा केल्या. गिलने या सामन्यात नवज्योत सिंग सिद्धू यांचा विक्रम मोडला. वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे दोन्ही सलामीवीर पाच धावांच्या आत त्रिफळाचीत झाले.
सलग दोन झेल सुटल्याने Avesh Khan चा पारा चढला; या सामन्यात Ball Boy स्टार बनला, Video
क्विंटन डी कॉक आणि यानेमन मलान ( २२) यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली आणि मलानला २२ धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. टेम्बा बवुमा ( ८) याचा शार्दूलने त्रिफळा उडवला. क्विंटन व हेनरिच क्लासेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रवी बिश्नोईने महत्त्वाची विकेट टिपली. ५४ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावा करणाऱ्य़ा क्विंटनला त्याने पायचीत केले. शार्दूलने ८-१-३५-२ अशी कामगिरी केली. कुलदीपने ८ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली. अखेरच्या षटकांत मिलर व क्लासेन यांनी फटकेबाजीला सुरुवात केली.
मिलर व क्सासेन यांनी ८५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. बिश्नोई महागडा गोलंदाज ठरला, त्याने ८ षटकांत ६९ धावा देत १ विकेट घेतली. क्लासेनने ६५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या, तर मिलर ६३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ४ बाद २५० धावा केल्या. या दोघांनी १०६ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात भारताला समाधानकारक सुरुवात करता आली नाही. कागिसो रबाडाने भारताला पहिला धक्का देताना शुबमन गिलचा ( ३) त्रिफळा उडवला. पण, गिलने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ५००+ धावा करण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने १० डावात हा टप्पा ओलांडताना नवज्योत सिद्धू ( ११ डाव) यांचा विक्रम मोडला.
वेन पार्नेलने टाकलेला चेंडू शिखर धवनच्या बॅटची किनार घेत यष्टिंवर आदळला अन् भारताला ८ धावांवर दुसरा धक्का बसला. धवनने ४ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA 1st ODI Live Updates : Shubman Gill becomes the fastest Indian to complete 500 runs in ODI in terms of innings, india loss shikhar dhawana & gill in just 8 runs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.