Join us  

IND vs SA 1st ODI: IND vs SA पहिल्या एकदिवसीय सामन्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन अपडेट 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 12:01 PM

Open in App

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 मालिका पार पडल्यानंतर आजपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. मात्र आज होणाऱ्या पहिल्या सामन्याची अचानक वेळ बदलण्यात आली आहे. पावसाच्या विलंबामुळे नाणेफेक आणि सामन्याची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नाणेफेक 1.30 वाजता होणार असून 2 वाजता सामना सुरू होईल. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वात असणार आहे, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिका खेळलेला विश्वचषकाचा संघ आगामी विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. रोहित सेनेने प्रथमच दक्षिण आफ्रिकेला आपल्या मायदेशात पराभूत करून शानदार सुरूवात केली. भारताने टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 ने पराभव केला होता. 

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार),  श्रेयस अय्यर ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर. 

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स,  हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक पहिला एकदिवसीय सामना - 6 ऑक्टोबर, रांचीदुसरा एकदिवसीय सामना - 9 ऑक्टोबर, लखनौतिसरा एकदिवसीय सामना - 11 ऑक्टोबर, दिल्ली 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनबीसीसीआयरांचीसंजू सॅमसन
Open in App