IND vs SA: कुणी कॅमेऱ्यात घेतं का कॅमेऱ्यात! मुरली कार्तिकच्या मागे चहरने केलेल्या कृत्याने पिकला हशा, Video Viral

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:04 PM2022-10-06T17:04:41+5:302022-10-06T17:05:36+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st ODI Video of Deepak Chahar behind Murali Karthik after toss is going viral | IND vs SA: कुणी कॅमेऱ्यात घेतं का कॅमेऱ्यात! मुरली कार्तिकच्या मागे चहरने केलेल्या कृत्याने पिकला हशा, Video Viral

IND vs SA: कुणी कॅमेऱ्यात घेतं का कॅमेऱ्यात! मुरली कार्तिकच्या मागे चहरने केलेल्या कृत्याने पिकला हशा, Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA 1st ODI । रांची : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळत आहे. मुसळधार पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक मुरली कार्तिक अपडेट देत असताना भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर फ्रेममध्ये आला आणि त्याने जे कृत्य केले ते पाहून सर्वांनाच हशा पिकला. 

चहरच्या कृत्याने पिकला हशा 
दीपक चहरच्या नकळत मुरली कार्तिक सामन्याशी संबंधित अपडेट्स देत होता. तेवढ्यात त्याच्यामागे आल्यावर दीपक चहर शांतपणे उभा राहिला आणि दोन्ही हात जोडून कॅमेऱ्याच्या मागे पोज देताना दिसला. दीपक चहरला हे करताना पाहून चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

दीपक चहर मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. टी-20 विश्वचषक 2022साठी तो राखीव खेळाडू आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर चहरची संघात वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र त्याला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सध्या सुरू असलेल्या सामन्यात साजेशी सुरूवात केली असून पहिल्या पॉवरप्लेमध्ये 29 धावा केल्या. लक्षणीय बाब म्हणजे पावसाच्या विलंबामुळे आजचा सामना 40 षटकांचा होणार असून पहिला पॉवरप्ले 8 षटकांचा असेल.  दुसरा पॉवरप्ले 24 आणि तिसरा पॉवरप्ले केवळ 8 षटकांचा असणार आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान. 

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक 
पहिला एकदिवसीय सामना - 6 ऑक्टोबर, रांची
दुसरा एकदिवसीय सामना - 9 ऑक्टोबर, लखनौ
तिसरा एकदिवसीय सामना - 11 ऑक्टोबर, दिल्ली
 

Web Title: IND vs SA 1st ODI Video of Deepak Chahar behind Murali Karthik after toss is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.