Join us  

सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, तरीही सुनील गावसकर भडकले; नक्की कारण काय?

सुनील गावसकर रोखठोक मत व्यक्त करण्यासाठी कायमच चर्चेत असतात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 2:42 PM

Open in App

Sunil Gavaskar IND vs SA T20: लिटल मास्टर सुनील गावसकर हे कायम सामन्याबद्दल आणि खेळाडूंबद्दल रोखठोक मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जेव्हा ते कोणत्याही विषयावर बोलतात, तेव्हा त्याकडे सर्वांचे लक्ष असते. क्रिकेटशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्रिकेटपटू, तज्ज्ञ आणि चाहते त्यांचे मत लक्ष देऊन ऐकतात. समालोचन करताना त्यांची अनेक विधाने मोठ्या चर्चेचा किंवा वादाचा विषय ठरतात. काल भारत-आफ्रिका यांच्यात पहिला टी२० सामना होणार होता, पण तो पावसामुळे रद्द झाला. एकही चेंडूचा खेळ झाला नसूनही गावसकर चिडले. जाणून घेऊया यामागचं कारण.

गावस्कर का संतापले?

सामना झाला नाही तर मग गावस्कर कशामुळे चिडले? एकही चेंडू टाकला नाही तर गावस्कर कशाबद्दल टीका करत होते? असे सवाल क्रिकेटरसिकांच्या मनात येत आहेत. प्रत्यक्षात पावसामुळे हा सामना एकदाही सुरू होऊ शकला नाही. मध्येच पाऊस थांबला तरीही सामना सुरू करताच येत नव्हता आणि त्यामुळे गावस्कर संतापले. क्रिकेट स्टेडियममध्ये पाऊस पडल्यास संपूर्ण मैदान का झाकले जात नाही यावर ते संतापले होते.

डर्बनमध्ये पावसादरम्यान फक्त खेळपट्टी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कव्हरने झाकलेला होता. अशा स्थितीत गावस्कर क्रिकेट दक्षिण आफ्रिकाच्या व्यवस्थापनावर संतापले. जर मैदान पूर्णपणे झाकले असते, तर पाऊस थांबल्यावर काही काळ तरी खेळ सुरू होऊ शकला असता असे त्यांनी मत मांडले. प्रत्येक क्रिकेट बोर्डाकडे निश्चितपणे अतिरिक्त कव्हर खरेदी करून मैदान पूर्णपणे झाकण्यासाठी पुरेसे पैसे आहेत आणि अशी परिस्थिती टाळता येऊ शकते. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही पावसाने अनेक सामन्यांचा बेरंग केला होता. त्यामुळे मैदान झाकण्याची प्रणाली असल्याचे पाऊस थांबल्यावर लगेच खेळ सुरू होऊ शकतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासुनील गावसकरऑफ द फिल्डद. आफ्रिका