Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

India vs South Africa 1st T20I Live : इशान किशन ( Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:56 PM2022-06-09T20:56:36+5:302022-06-09T20:57:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Live : A mixup between Shreyas Iyer and Rishabh Pant, but Indian captain survives run-out, Watch Video | Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live : इशान किशन ( Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या सर्व फलंदाजांचे फटके एकदम दमदार होते आणि त्यात आफ्रिकेच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने त्यांना मदतच केली. रिषभला भोपळ्यावर बाद करण्याची संधी दक्षिण आफ्रिकेला आयती चालून आली होती, परंतु एकच गोंधळ उडाला. रिषभ व कागिसो रबाडा यांच्यात टक्कर झाली आणि त्यानंतर... ( India vs South Africa 1st T20I  सामन्याचा धावफलक एका क्लिकवर)

लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांनी ३८ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराजने सुरेख षटकार खेचला, परंतु पार्नेलने दुसऱ्याच चेंडूवर भारताला धक्का दिला. ऋतुराज १५ चेंडूंत ३ षटकार खेचून २३ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने फिरकीपटू तब्रेज शम्सीला टार्गेट केले. १०व्या षटकात अय्यरने दोन खणखणीत षटकार खेचले. भारताने ९.४ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. इशानने केशव महाराजच्या एका षटकात ६,६,४,४ अशा २० धावा कुटल्या. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर इशान झेलबाद झाला. त्याने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. अय्यर ३६ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ व हार्दिकने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. 

इशान किशनने धु धु धुतले..., त्यानंतर इतरंनीही हात साफ केले; आफ्रिकेसमोर दोनशेपार लक्ष्य ठेवले, Video

या दोघांनी १८ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. रिषभ १६ चेंडूंत २९ धावा करून माघारी परतला. हार्दिकने १२ चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद २११ धावांचा डोंगर उभा केला. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोत्तम खेळी ठरली. रिषभला शून्यावर बाद करण्याची संधी आफ्रिकेने गमावली. १३व्या षटकात  कागिसो रबाडाने टाकलेला चेंडू अय्यरने हलका मारला. नॉन स्ट्रायकर एंडवरील रिषभने क्रिज सोडले अन् त्याचवेळी अय्यरने माघारी जाण्याचा इशारा केला. तेव्हा रबाडा व रिषभची टक्कर झाली.

पाहा व्हिडीओ...

Web Title: IND vs SA 1st T20I Live : A mixup between Shreyas Iyer and Rishabh Pant, but Indian captain survives run-out, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.