Dinesh Karthik is back! २०१९मध्ये डच्चू मिळाला, समालोचन केले अन् IPL 2022 तील कामगिरीच्या जोरावर तीन वर्षांनंतर कमबॅक केले

India vs South Africa 1st T20I Live : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ खेळत असला तरी आजच्या सामन्यातून दिनेश कार्तिकचे ( Dinesh Karthik) झालेले पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:09 PM2022-06-09T19:09:49+5:302022-06-09T19:11:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Live : Dinesh Karthik, dropped from after 2019 World Cup, did commentary for Sky, having a great IPL 2022 & now, making his return to ICT after 3 long years | Dinesh Karthik is back! २०१९मध्ये डच्चू मिळाला, समालोचन केले अन् IPL 2022 तील कामगिरीच्या जोरावर तीन वर्षांनंतर कमबॅक केले

Dinesh Karthik is back! २०१९मध्ये डच्चू मिळाला, समालोचन केले अन् IPL 2022 तील कामगिरीच्या जोरावर तीन वर्षांनंतर कमबॅक केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ खेळत असला तरी आजच्या सामन्यातून दिनेश कार्तिकचे ( Dinesh Karthik) झालेले पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. २०१९नंतर तो प्रथमच भारताच्या निळ्या जर्सीत दिसला.. आयपीएल २०२२मधील दमदार कामगिरीच्या जोरावर दिनेश कार्तिकने ( DK) टीम इंडियात पुनरागमन केले. त्याच्याकडे फिनिशर म्हणून पाहिले जात आहे आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही त्याची संघात हीच भूमिका असेल हे स्पष्ट केले आहे.  


२०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संघातून डच्चू दिला... त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना दिनेश कार्तिकने दमदार खेळ करून तामिळनाडूला जेतेपद पटाकवून दिले. Sky चॅनेलसाठी समालोचन केले... आयपीएल २०२२मध्ये फिनिशरची भूमिका चोख बचावली अन् ३ वर्षांनंतर टीम इंडियात पुन्हा जागा पटकावली... ९ जुलै २०१९मध्ये दिनेश कार्तिकने भारताकडून अखेरची वन डे मॅच खेळली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर दिनेशलाही मर्यादित षटकांच्या संघातून डच्चू दिला गेला. पण, तो खचला नाही, स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने दमदार खेळ केला आणि त्यात त्याला आयपीएल २०२२ने संजीवनी दिली. 

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत कार्तिक इंग्लंडमध्ये समालोचन करताना दिसला तेव्हा त्याची क्रिकेट कारकीर्द संपली असेच म्हटले गेले होते. पण, आजचे त्याचे पुनरामगमन सर्वांना चपराक देणारे ठरले.  दिनेश कार्तिकने यंदाच्या पर्वात १६ सामन्यांत ५५ च्या सरासरीने आणि १८३.३३च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या. १६ डावांत तो १० वेळा नाबाद राहिला आणि एक अर्धशतक झळकावले. नाबाद ६६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. 

भारत - इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक,  अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल ( India: 1 Ishan Kishan, 2 Ruturaj Gaikwad, 3 Shreyas Iyer, 4 Rishabh Pant (capt&wk), 5 Hardik Pandya, 6 Dinesh Karthik, 7 Axar Patel, 8 Harshal Patel, 9 Bhuvneshwar Kumar, 10 Yuzvendra Chahal, 11 Avesh Khan)

दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक, टेम्बा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, त्रिस्तान स्तुब्ब्स ( पदार्पण), वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, केशव महाराज, तब्रेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया ( South Africa: 1 Quinton de Kock (wk), 2 Temba Bavuma (capt), 3 Rassie van der Dussen, 4 David Miller, 5 Tristan Stubbs, 6 Wayne Parnell, 7 Dwaine Pretorius, 8 Keshav Maharaj, 9 Tabraiz Shamsi, 10 Kagiso Rabada, 11 Anrich Nortje) 

Web Title: IND vs SA 1st T20I Live : Dinesh Karthik, dropped from after 2019 World Cup, did commentary for Sky, having a great IPL 2022 & now, making his return to ICT after 3 long years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.