Join us  

Harshal Patel, IND vs SA 1st T20I Live : हर्षल पटेलने डोकेदुखी ठरणाऱ्या ड्वेन प्रेटोरियसला 'मामा' बनवला, बघा कसा त्रिफळा उडवला, Video 

India vs South Africa 1st T20I Live : २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडूनही स्फोटक सुरुवात झाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 9:35 PM

Open in App

India vs South Africa 1st T20I Live : २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडूनही स्फोटक सुरुवात झाली. ड्वेन प्रेटोरियसने ( Dwaine Pretorius)  तर हार्दिक पांड्याला टार्गेट करताना एकाच षटकात तीन खणखणीत षटकार खेचून धावांचा वेग भारतापेक्षा जास्त ठेवला. पण, हर्षल पटेलने त्याला 'मामा' बनवला... ( India vs South Africa 1st T20I  सामन्याचा धावफलक एका क्लिकवर)

इशान किशन ( Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या सर्व फलंदाजांचे फटके एकदम दमदार होते आणि त्यात आफ्रिकेच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने त्यांना मदतच केली. इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांनी ३८ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. ऋतुराज १५ चेंडूंत ३ षटकार खेचून २३ धावांवर बाद झाला. इशानने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. अय्यर ३६ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ व हार्दिकने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. या दोघांनी १८ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. रिषभ १६ चेंडूंत २९ धावा करून माघारी परतला. हार्दिकने १२ चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद २११ धावांचा डोंगर उभा केला.  

Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमाची ( १०) विकेट जरी गमावली असली तरी त्यांनी ४.४ षटकांत फलकावर अर्धशतक झळकावले. ड्वेन प्रेटोरियसने ५व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर ३ खणखणीत षटकार खेचले. त्यानंतर कर्णधार रिषभने पुढील षटकात हर्षल पटेलला ( Harshal Patel) गोलंदाजीला आणले आणि त्याने चतुराईने प्रेटोरियसला बाद केले. हर्षलने टाकलेला संथ चेंडू प्रेटोरियसला हेरता आला नाही आणि त्याचा त्रिफळा उडाला. माघारी परतताना तो डोक्यावर हात मारताना दिसला.

पाहा विकेट... 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहार्दिक पांड्या
Open in App