Join us  

Ishan Kishan, IND vs SA 1st T20I Live : १४ चेंडूंत ६२ धावा; इशान किशनच्या फटकेबाजीने आफ्रिकन गोलंदाजांची काढली हवा, Video

India vs South Africa 1st T20I Live : इशान किशनने ( Ishan Kishan) आज दिल्लीचे स्टेडियम दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 8:01 PM

Open in App

India vs South Africa 1st T20I Live : इशान किशनने ( Ishan Kishan) आज दिल्लीचे स्टेडियम दणाणून सोडले. ऋतुराज गायकवाडसह आश्वासक सुरुवात करताना इशानने भारताला चांगली सुरुवात करून दिली. इशानने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करताना ३७ चेंडूंत ट्वेंटी-२०तील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तर इशान तुफान सुटला.  

रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ खेळत असला तरी आजच्या सामन्यातून दिनेश कार्तिकचे ( Dinesh Karthik) झालेले पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. २०१९नंतर तो प्रथमच भारताच्या निळ्या जर्सीत दिसला.. आयपीएल २०२२मधील दमदार कामगिरीच्या जोरावर दिनेश कार्तिकने ( DK) टीम इंडियात पुनरागमन केले. हार्दिक पांड्याही संघात परतला आहे.  उम्रान मलिकला मात्र आज पदार्पणाची संधी मिळालेली नाही. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे इशान किशनऋतुराज गायकवाड या नव्या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. ( India vs South Africa 1st T20I  सामन्याचा धावफलक एका क्लिकवर)

फिरकीपटू केशव महाराजला पहिले षटक देऊन कर्णधार टेम्बा बवुमाने दडपण टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु इशान किशनने तो झुगारून लावला. त्यानंतर कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया व वेन पार्नेल अशी जलदगती गोलंदाजांची फौज मैदानावर उतरली. पण, इशान व ऋतुराज यांनी दमदार फटकेबाजी केली. ऋतुराजने मारलेले षटकार पाहण्यासारखे होते. या दोघांनी ५.५ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराजने सुरेख षटकार खेचला, परंतु पार्नेलने दुसऱ्याच चेंडूवर भारताला धक्का दिला. ऋतुराज १५ चेंडूंत ३ षटकार खेचून २३ धावांवर बाद झाला. पण, इशान आफ्रिकेच्या गोलंदाजांना आवरत नव्हता. 

ड्वेन प्रेटोरियसने टाकलेल्या ९व्या षटकाची सुरूवात व शेवट इशानने चौकाराने केली. अखेरच्या चेंडूवर मारलेला बुलेट शॉट आफ्रिकेच्या गोलंदाजांना धडकी भरवणारा होता. श्रेयस अय्यरने फिरकीपटू तब्रेज शम्सीला टार्गेट केले. १०व्या षटकात अय्यरने दोन खणखणीत षटकार खेचले. भारताने ९.४ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. केशव महाराजला डाव्या बाजूला षटकार खेचून इशानने ट्वेंटी-२० तील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. इशानने ३७ चेंडूंत ९ चौकार १ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तर त्याने केशव महाराजच्या एका षटकात ६,६,४,४ अशा २० धावा कुटल्या. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर इशान झेलबाद झाला. त्याने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाइशान किशनऋतुराज गायकवाड
Open in App