भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द, आता १२ तारखेला दुसरा सामना होणार 

India vs South Africa 1st T20I Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ अशा विजयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:28 PM2023-12-10T21:28:10+5:302023-12-10T21:28:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Live :  Not so great news from Durban as the 1st T20I has been called off due to incessant rains. | भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द, आता १२ तारखेला दुसरा सामना होणार 

भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द, आता १२ तारखेला दुसरा सामना होणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ अशा विजयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा ब्रिगेडची खडतर कसोटी लागणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ डोळ्यासमोर ठेवताना युवा खेळाडूंना पुन्हा आपली छाप पाडण्याची संधी आहे. पण, आजच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द करावा लागला. 


किंग्समीड येथे आतापर्यंत खेळलेल्या १९ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत. २००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामना टाय झाला होता, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. रात्री ८.१० च्या आधी सामना सुरु होईल अशी अपेक्षा होती, परंतु ९ वाजले तरीही तिथे पाऊस सुरू होता. त्यामुळे षटकं कमी होण्यास सुरुवात झाली होती. प्रेक्षक छत्री उघडून उभे होते, तर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये मजा करताना दिसले.

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील ४ ट्वेंटी-२० सामन्यांतील भारताने दोन जिंकल्या आहेत, परंतु अन्य दोन ड्रॉ राहिल्या आहेत. ऑक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ( २-०) भारताविरुद्ध शेवटची ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती. 
  • भारताकडून २०२३ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५ विकेट्स अर्शदीप सिंगच्या नावावर आहेत. आयसीसीच्या सर्व सदस्यांमध्ये २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अर्शदीप दुसऱ्या क्रमांकावर आहे.  
     

Web Title: IND vs SA 1st T20I Live :  Not so great news from Durban as the 1st T20I has been called off due to incessant rains.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.