India vs South Africa 1st T20I Live : लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे रिषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली अन् आज त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रिषभने मैदानावर उतरताच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचा विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ३ वर्षांनंतर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन झाले आहे.
लोकेशच्या माघारीमुळे आजच्या सामन्यात इशान किशन व ऋतुराज गायकवाड हे सलामीला खेळणे निश्चित झाले आहे. लोकेशच्या जागी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत १५ ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात भारताने ९ सामने जिंकले. आफ्रिकेला ६ सामने जिंकता आले आहेत.
आजच्या सामन्यातून रिषभ पंतनेही एक विक्रम नावावर केला आहे. ट्वेंटी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा तो दुसरा युवा कर्णधार ठरला आहे. तो २४ वर्ष व २४८ दिवसांचा आहे. सुरेश रैनाने २३ वर्ष व १९७ दिवसांचा असताना ट्वेंटी-२०त भारताचे नेतृत्व सांभाळले होते. रिषभने आज महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. धोनीने २६ वर्ष व ६८ दिवसांचा असताना प्रथम ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद भूषविले होते.
India's youngest T20I captains:
- 23y 197d - Suresh Raina
- 24y 248d - Rishabh Pant
- 26y 68d - MS Dhoni
- 27y 41d - Ajinkya Rahane
- 28y 42d - Virender Sehwag
भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यात भारतात झालेल्या सामन्यांचे निकाल
- २ -१०-२०१५ - धर्मशाला, दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्स राखून विजय
- ५-१०-२०१५ - कटक, दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेट्स राखून विजय
- १८-०९-२०१९ - मोहाली, भारताचा ७ विकेट्स राखून विजय
- २२-०९-२०१९ - बंगळुरू, दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्स राखून विजय
भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि त्यांनी अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानला नमवून टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्डचा पाया रचला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 12 पैकी 9 सामने जिंकले आणि आता रिषभच्या नेतृत्वाखाली विश्व विक्रमाची नोंद होण्याची संधी आहे.
भारत - इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल ( India: 1 Ishan Kishan, 2 Ruturaj Gaikwad, 3 Shreyas Iyer, 4 Rishabh Pant (capt&wk), 5 Hardik Pandya, 6 Dinesh Karthik, 7 Axar Patel, 8 Harshal Patel, 9 Bhuvneshwar Kumar, 10 Yuzvendra Chahal, 11 Avesh Khan)
दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक, टेम्बा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, त्रिस्तान स्तुब्ब्स ( पदार्पण), वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, केशव महाराज, तब्रेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया ( South Africa: 1 Quinton de Kock (wk), 2 Temba Bavuma (capt), 3 Rassie van der Dussen, 4 David Miller, 5 Tristan Stubbs, 6 Wayne Parnell, 7 Dwaine Pretorius, 8 Keshav Maharaj, 9 Tabraiz Shamsi, 10 Kagiso Rabada, 11 Anrich Nortje)
Web Title: IND vs SA 1st T20I Live : Rishabh Pant become second youngest player to lead team India in T20I, South Africa won the toss and decided to bowl first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.