India vs South Africa 1st T20I Live Update Marathi : घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा ब्रिगेडची खडतर कसोटी लागणार आहे. दुखापतग्रस्त कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएल सुरू होईपर्यंत बाहेर आहे आणि रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी फलंदाजांसह मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ब्रेकवर आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना पुन्हा आपली छाप पाडण्याची संधी आहे.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील ४ ट्वेंटी-२० सामन्यांतील भारताने दोन जिंकल्या आहेत, परंतु अन्य दोन ड्रॉ राहिल्या आहेत. ऑक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ( २-०) भारताविरुद्ध शेवटची ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती.
- भारताकडून २०२३ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५ विकेट्स अर्शदीप सिंगच्या नावावर आहेत. आयसीसीच्या सर्व सदस्यांमध्ये २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अर्शदीप दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- किंग्समीड येथे आतापर्यंत खेळलेल्या १९ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत. २००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामना टाय झाला होता, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते.
आजच्या सामन्यातही पावसाने खोडा घातला आहे आणि कव्हर्स झाकलेले आहेत. रात्री ८.१० वाजेपर्यंत सामना सुरू न झाल्यास षटकं कमी होतील.