Join us  

Rassie van der Dussen, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने दिलेलं जीवदान अन् Umpire's call ने टीम इंडियाला हरवले?; २००+ धावा करूनही प्रथमच पराभूत झाले 

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत धावांचा पाऊस पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 10:58 PM

Open in App

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. भारताने उभं केलेलं २१२ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून सहज पार केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांकडून जशा चूका झाल्या, तशा भारतीयांकडूनही झाल्या. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) मोक्याच्या क्षणी रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( Rassie van der Dussen) झेल सोडून जीवदान दिले. त्यात १९व्या षटकात  Umpire's call ने भारताच्या पुनरागमनाची दारं बंद केली. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला असता पण... 

श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

इशान किशनने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा करून भारताचा पाया मजबूत केला. ऋतुराज गायकवाड ( २३), श्रेयस अय्यर ( ३६), रिषभ पंत ( २९) व हार्दिक पांड्या ( ३१*) यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमाची ( १०) विकेट जरी गमावली असली तरी त्यांनी ४.४ षटकांत फलकावर अर्धशतक झळकावले. ड्वेन प्रेटोरियसचा ( २९) व क्विंटन डी कॉक ( २२) हे माघारी परतल्यानंतर डेव्हिड मिलर व  रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी दमदार फटकेबाजी केली. 

श्रेयस अय्यरने  त्यात आवेश खानने टाकलेल्या १६व्या षटकात व्हॅन डेर ड्यूसेनचा झेल सोडला. त्यानंतर १९व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर व्हॅन डेर ड्यूसेनसाठी LBW ची अपील झाली. मैदानावरील अम्पायने नाबाद दिल्यानंतर DRS घेतला गेला आणि त्यात तिसऱ्या अम्पायरने  Umpire's call कायम ठेवला. हर्षलने टाकलेला चेंडू ड्यूसेनच्या पायावर थेट आदळला, परंतु तो क्रिज सोडून फटका मारण्यासाठी पुढे आला होता. रिप्लेत जरी चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे दिसत असले तरी तो पुढे येऊन खेळल्यामुळे तिसऱ्या अम्पायरने मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला.  व्हॅन डेर ड्यूसेन ४६ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर, तर मिलर ३१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद  राहिला. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी करताना आफ्रिकेला ७ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवून दिला. या दोघांनी अखेरच्या ८.१ षटकांत १२० धावा कुटल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाश्रेयस अय्यर
Open in App