David Miller, IND vs SA 1st T20I Live : डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली

दक्षिण आफ्रिकेकडू डेव्हिड मिलरने ( David Miller) किलर कामगिरी केली. त्याला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनची ( Rassie van der Dussen) दमदार साथ मिळाल्याने आफ्रिकेने बाजी मारली. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 10:31 PM2022-06-09T22:31:29+5:302022-06-09T22:34:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Live : unbeaten 131-run partnership between David Miller (64*) and Rassie van der Dussen (75*), South Africa beat India by 7 wickets | David Miller, IND vs SA 1st T20I Live : डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली

David Miller, IND vs SA 1st T20I Live : डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत धावांचा पाऊस पडला. दिल्लीच्या स्टेडियमवर भारताने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या उभारली अन् वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने मोठी झेप घेतली. पण, दक्षिण आफ्रिकेकडू डेव्हिड मिलरने ( David Miller) किलर कामगिरी केली. त्याला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनची ( Rassie van der Dussen) दमदार साथ मिळाल्याने आफ्रिकेने बाजी मारली. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी केली. आजचा सामना जिंकून सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी भारताला होती. पण, मिलर व ड्यूसेन यांनी भारताला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापासून रोखले. भारताला १२ विजयांसह  अफगाणिस्ता व रोमानिया यांच्यासह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल. 

इशान किशन ( Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या सर्व फलंदाजांचे फटके एकदम दमदार होते आणि त्यात आफ्रिकेच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने त्यांना मदतच केली. इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांनी ३८ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. ऋतुराज १५ चेंडूंत ३ षटकार खेचून २३ धावांवर बाद झाला. इशानने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. अय्यर ३६ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ व हार्दिकने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. या दोघांनी १८ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. रिषभ १६ चेंडूंत २९ धावा करून माघारी परतला. हार्दिकने १२ चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद २११ धावांचा डोंगर उभा केला.  भारताची ही दिल्लीतल्या स्टेडियममधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. 


दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमाची ( १०) विकेट जरी गमावली असली तरी त्यांनी ४.४ षटकांत फलकावर अर्धशतक झळकावले. ड्वेन प्रेटोरियसने ५व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर ३ खणखणीत षटकार खेचले. त्यानंतर कर्णधार रिषभने पुढील षटकात हर्षल पटेलला ( Harshal Patel) गोलंदाजीला आणले आणि त्याने चतुराने प्रेटोरियसला बाद केले. हर्षलने टाकलेला संथ चेंडू प्रेटोरियसला हेरता आला नाही आणि त्याचा त्रिफळा उडाला. माघारी परतताना तो डोक्यावर हात मारताना दिसला. त्यानंतर आफ्रिकेचा डाव मंदावला. त्यात अक्षर पटेलने ९व्या षटकात क्विंटन डी कॉकला ( २८) इशान किशनकरवी झेलबाद करून मोठा धक्का दिला.

आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्ससाठी मॅच विनर ठरलेल्या डेव्हिड मिलरने आफ्रिकेचा संघर्ष सुरू ठेवताना रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनसह ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. आफ्रिकेला अखेरच्या ६ षटकांत ७८ धावा करायच्या होत्या. हर्षलची दोन षटकं रिषभने राखून ठेवली होती. डेव्हिड मिलरने २२  चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरने  त्यात आवेश खानने टाकलेल्या १६व्या षटकात व्हॅन डेर ड्यूसेनचा झेल सोडला. पण, आवेशने त्या षटकात ८ धावा दिल्या आणि त्यामुळे आफ्रिकेला २४ चेंडूंत ५६ धावा करायच्या होत्या.

हर्षलने टाकलेल्या १७व्या षटकात व्हॅन डेर ड्यूसेनने ६,६,४,०,६,० खेचून अर्धशतक पूर्ण केले. व्हॅन डेर ड्यूसेनने ३७ चेंडूंत त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. हर्षलच्या त्या षटकात २२ धावा आल्याने सामना १८ चेंडूंत ३४ धावा असा जवळ आला. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या १८व्या षटकात व्हॅन डेर ड्यूसेनने २२ धावा चोपल्या आणि मिलरसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. आता १२ चेंडूंत १२ धावा करायच्या होत्या आणि टीम इंडियाचे सपोर्टर मैदान सोडताना दिसले. आफ्रिकेने २०१५मध्ये धर्मशाला येथे ३ बाद २०० धावा करून विजय मिळवला होता आणि तो आतापर्यंत सर्वोत्तम धावांचा यशस्वी पाठलाग होता. पण, आज त्यांनी २१२ धावा करून तो विक्रम मोडला. आफ्रिकेने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

व्हॅन डेर ड्यूसेन ४६ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर, तर मिलर ३१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद  राहिला. 
 

Web Title: IND vs SA 1st T20I Live : unbeaten 131-run partnership between David Miller (64*) and Rassie van der Dussen (75*), South Africa beat India by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.