IND vs SA 1st T20I Live Updates : ११ सेकंदात ५ विकेट्स! Arshdeep Singh, दीपक चहर यांचा 'कहर', रोहित शर्माची 'रिअ‍ॅक्शन' Viral, Video 

India vs South Africa 1st T20I Live Updates : अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कहर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 08:23 PM2022-09-28T20:23:36+5:302022-09-28T20:24:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Live Updates : 5 wickets in 11 seconds; Arshdeep Singh, Deepak Chahar destroy South Africa, Rohit Sharma reacts; video viral   | IND vs SA 1st T20I Live Updates : ११ सेकंदात ५ विकेट्स! Arshdeep Singh, दीपक चहर यांचा 'कहर', रोहित शर्माची 'रिअ‍ॅक्शन' Viral, Video 

IND vs SA 1st T20I Live Updates : ११ सेकंदात ५ विकेट्स! Arshdeep Singh, दीपक चहर यांचा 'कहर', रोहित शर्माची 'रिअ‍ॅक्शन' Viral, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live Updates : अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कहर केला. सुरुवातीलाच गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था आफ्रिकेची केल्यानंतर स्टेडियमवर नादखुळा जल्लोष सुरू झाला. ही दक्षिण आफ्रिकेची जगभरातील निचांक कामगिरी ठरली. आतापर्यंत कोणत्याही संघाला २.३ षटकांमध्ये कोणत्याही संघाने पाच विकेट्स गमावलेल्या नाहीत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोलंदाजांची अफलातून कामगिरी पाहून थक्क झाला. 


भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २० ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात जय-पराजयाचे पारडे हे भारताच्या बाजूने ११-८ असे आहे. पण, भारताला घरच्या मैदानावर ५ वेळा आफ्रिकेकडून हार मानावी लागली आहे. ९ पैकी ३ सामने भारताला जिंकता आले आहेत. मागे झालेल्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने बाजी मारली होती. त्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली गेली होती. हार्दिकच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे, जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे आज मुकावे लागले आणि त्याच्या जागी दीपक चहर खेळणार आहे, युजवेंद्र चहलच्या जागी आर अश्विन खेळेल.  

दीपक चहरने पहिल्याच षटकात अप्रतिम इनस्वींग चेंडू टाकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचा त्रिफळा उडवला. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात आफ्रिकेचा दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवला. आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर 1 धावेवर माघारी परतले. अर्शदीपने टाकलेला चेंडू क्विंटनच्या बॅटची इनसाईड एज घेत यष्टींवर आदळला. अर्शदीपने त्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर आफ्रिकेला दोन धक्के दिले. रिली रोसोवू व डेव्हिड मिलर शून्यावर बाद झाले. पुढच्या षटकात अर्शदीपची हॅटट्रिकची संधी हुकली. 



एडन मार्करामन व वेन पार्नेल यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. ३३ धावांची ही भागीदारी हर्षल पटेलने तोडली. मार्कराम २५ धावांवर माघारी परतला. वेन पार्नेलची ( २४) विकेट अक्षर पटेलने घेतली. दीपक चहरने ४ षटकांत २४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ४-१-८-० अशी अप्रतिम गोलंदाजी केली. २००७मध्ये आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावांत निम्मा संघ गमावला होता. 

Web Title: IND vs SA 1st T20I Live Updates : 5 wickets in 11 seconds; Arshdeep Singh, Deepak Chahar destroy South Africa, Rohit Sharma reacts; video viral  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.