Join us  

IND vs SA 1st T20I Live Updates : अर्शदीप सिंग, दीपक चहरचा भन्नाट मारा! ९ धावांत ५ विकेट्स गमावूनही आफ्रिकेने पार केला शतकी पल्ला

IND vs SA 1st T20I Live Updates : गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था आफ्रिकेची केल्यानंतर स्टेडियमवर नादखुळा जल्लोष सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 8:38 PM

Open in App

India vs South Africa 1st T20I Live Updates : अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कहर केला. गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था आफ्रिकेची केल्यानंतर स्टेडियमवर नादखुळा जल्लोष सुरू झाला.  २००७मध्ये आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावांत निम्मा संघ गमावला होता. केशव महाराजने  ( Keshav Maharaj) उल्लेखनीय कामगिरी करून भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे केले. 

११ सेकंदात ५ विकेट्स! Arshdeep Singh, दीपक चहर यांचा 'कहर', रोहित शर्माची 'रिअ‍ॅक्शन' Viral, Video 

दीपक चहरने पहिल्याच षटकात अप्रतिम इनस्वींग चेंडू टाकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचा त्रिफळा उडवला. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात आफ्रिकेचा दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवला. आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर 1 धावेवर माघारी परतले. अर्शदीपने टाकलेला चेंडू क्विंटनच्या बॅटची इनसाईड एज घेत यष्टींवर आदळला. अर्शदीपने त्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर आफ्रिकेला दोन धक्के दिले. रिली रोसोवू व डेव्हिड मिलर शून्यावर बाद झाले. पुढच्या षटकात अर्शदीपची हॅटट्रिकची संधी हुकली.  एडन मार्करामन व वेन पार्नेल यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. ३३ धावांची ही भागीदारी हर्षल पटेलने तोडली. मार्कराम २५ धावांवर माघारी परतला. वेन पार्नेलची ( २४) विकेट अक्षर पटेलने घेतली. दीपक चहरने ४ षटकांत २४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ४-१-८-० अशी अप्रतिम गोलंदाजी केली. केशव महाराजने १९व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर १७ धावा चोपून संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अर्शदीपने ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. केशव महाराजने खिंड लढवली आणि त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आफ्रिकने ८ बाद १०६ धावा केल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मादीपक चहर
Open in App