India vs South Africa 1st T20I Live Updates : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा अँड टीम आजपासून दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-२०त सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली गेली आहे. त्यात टेंशन वाढवणारी बातमी म्हणजे मोहम्मद शमी अजूनही कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि दीपक हुडाने दुखापतीमुळे माघार घेतलीय. उमेश यादव, श्रेयस अय्यर व शाहबाज अहमद हे तीन खेळाडू या मालिकेत भारतीय संघात परतले आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २० ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात जय-पराजयाचे पारडे हे भारताच्या बाजूने ११-८ असे आहे. पण, भारताला घरच्या मैदानावर ५ वेळा आफ्रिकेकडून हार मानावी लागली आहे. ९ पैकी ३ सामने भारताला जिंकता आले आहेत. तिरुअनंतपूरम येथे तीन वर्षांनी ट्वेंटी-२० सामना होतोय.. खेळपट्टीवर गवत असल्याने सुरुवातीच्या काही षटकांत जलदगती गोलंदाजाला भरपूर मदत मिळणार आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला जरा अधिक फायदा मिळेल. येथे झालेल्या १० ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त ३ वेळा जिंकला आहे, तर ७ वेळा पराभूत झाला आहे.