IND vs SA 1st T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्.. 

सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा करताना दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:00 PM2022-09-28T22:00:31+5:302022-09-28T22:00:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Live Updates : Suryakumar Yadav now holds the record of most T20I runs by an Indian in a calendar year & holds the record of most sixes hit by a batter in T20Is in a year, Video | IND vs SA 1st T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्.. 

IND vs SA 1st T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्.. 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live Updates : रोहित शर्मा व विराट कोहली माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) आल्या आल्या खणखणीत षटकार खेचले. त्याच्या या दोन षटकारांनी दोन मोठे विक्रम मोडले. त्यात पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याचा वर्ल्ड रेकॉर्डही आहे. सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा करताना दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले आहे. 

अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कहर केला. सुरुवातीलाच गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था केली. २००७मध्ये आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावांत निम्मा संघ गमावला होता. केशव महाराजने  ( Keshav Maharaj) उल्लेखनीय कामगिरी करून भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे केले. दीपक चहरने ४ षटकांत २४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ४-१-८-० अशी अप्रतिम गोलंदाजी केली. अर्शदीपने ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

एडन मार्करामन व वेन पार्नेल यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. ३३ धावांची ही भागीदारी हर्षल पटेलने तोडली. मार्कराम २५ धावांवर माघारी परतला. वेन पार्नेलची ( २४) विकेट अक्षर पटेलने घेतली. केशव महाराजने १९व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर १७ धावा चोपून संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. केशव महाराजने खिंड लढवली आणि त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.  


१०७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघालाही झटके बसलेच... रोहित शर्मा शून्यावर, तर विराट कोहली ३ धावांवर माघारी परतले. भारताला पॉवर प्लेमध्ये १७ धावाच करता आल्या आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही भारताची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने पॉवर प्लेमध्ये ३ बाद २१ धावा केल्या होत्या. भारताच्या ७ षटकांत २ बाद  ३० धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन खणखणीत सिक्स  खेचले. या दोन षटकारांसह सूर्यकुमारने दोन मोठे विक्रमही नाववर केले. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. सूर्याने २०२२मध्ये ७००+ धाव करून शिखर धवनचा २०१८चा ६८९ धावांचा विक्रम मोडला. शिवाय कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ४४ षटकार मारणारा फलंदाजही तो बनला. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा ( ४२) २०२१मध्ये नोंदवलेला विक्रम मोडला.  सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या डावाला आकार दिला. 

 

Web Title: IND vs SA 1st T20I Live Updates : Suryakumar Yadav now holds the record of most T20I runs by an Indian in a calendar year & holds the record of most sixes hit by a batter in T20Is in a year, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.