India vs South Africa 1st T20I Live Updates : रोहित शर्मा व विराट कोहली माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) आल्या आल्या खणखणीत षटकार खेचले. त्याच्या या दोन षटकारांनी दोन मोठे विक्रम मोडले. त्यात पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याचा वर्ल्ड रेकॉर्डही आहे. सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा करताना दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले आहे.
अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कहर केला. सुरुवातीलाच गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था केली. २००७मध्ये आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावांत निम्मा संघ गमावला होता. केशव महाराजने ( Keshav Maharaj) उल्लेखनीय कामगिरी करून भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे केले. दीपक चहरने ४ षटकांत २४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ४-१-८-० अशी अप्रतिम गोलंदाजी केली. अर्शदीपने ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
एडन मार्करामन व वेन पार्नेल यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. ३३ धावांची ही भागीदारी हर्षल पटेलने तोडली. मार्कराम २५ धावांवर माघारी परतला. वेन पार्नेलची ( २४) विकेट अक्षर पटेलने घेतली. केशव महाराजने १९व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर १७ धावा चोपून संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. केशव महाराजने खिंड लढवली आणि त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.