Join us  

IND vs SA, 1st T20I: भारत आणि द.आफ्रिकेच्या संघांसमोर समान समस्या, सोडवेल तो मारेल बाजी

IND vs SA, 1st T20I: पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत आहेत. या सामन्यात कुठल्या ११ खेळाडूंसह उतरायचं याचं आव्हान दोन्ही संघांसमोर आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 9:51 AM

Open in App

तिरुवनंतपुरम - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत आहेत. या सामन्यात कुठल्या ११ खेळाडूंसह उतरायचं याचं आव्हान दोन्ही संघांसमोर आहे. सद्यस्थितीमध्ये दोन्ही संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. ते क्षणार्धात सामन्याचं चित्र पालटवू शकतात. अशा परिस्थिती कुठल्या खेळाडूंना संघात स्थान द्यावे आणि कुणाला वगळावं याबाबत निर्णय घेताना कर्णधार आणि प्रशिक्षकांची कसोटी लागणार आहे.

पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघात समावेश होणाऱ्या खेळाडूंचा विचार केल्यास कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचं सलामीसाठी स्थान निश्चित आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव खेळणार निश्चित आहे. दरम्यान, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रिशभ पंत याला संधी दिली जाऊ शकते.

त्याशिवाय सहाव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूच्या रूपात अक्षर पटेल आणि दीपक चहर यांना संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहसोबत हर्षल पटेलचं खेळणं निश्चित आहे. तर फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहल यांना संधी मिळू शकते.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या संघातून क्विंटन डी कॉकसोबत रिझा हेन्ड्रिक्स डावाची सुरुवात करू शकतात. तर मधल्या फळीत कर्णधार टेंबा बावुमा याच्यासोबत रिली रोसोऊ, अॅडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलरचा समावेश असेल. तर अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस याचाही संघात समावेश होऊ शकतो.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट
Open in App