Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी

संजू सॅमसनची कडक फलंदाजी, एका डावात दोन खास विक्रमाला घातली गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 09:36 PM2024-11-08T21:36:13+5:302024-11-08T21:44:09+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st T20I Sanju Samson Slams Back To Back Century And Set 3 Record In T20I | Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी

Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA 1st T20I Sanju Samson Slams Back To Back Century  : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डरबनच्या मैदानात रंगलेल्या टी-२० सामन्यात भारतीय विकेट किपर बॅटर संजू सॅमसनचा जलवा पाहायला मिळाला. बांगलादेश विरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात शतकी खेळी करून खास विक्रम सेट करणाऱ्या संजूनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कडक शतकी खेळीसह एका डावात ३ खास विक्रमाला गवसणी घातली आहे.  एक नजर त्याच्या खास विक्रमांवर

संजून अर्धशतक पूर्ण करताच साधला हा खास डाव

संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीसह तो भारताकडून सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा सर्वाधिक धावा करणारा विकेट किपरच्या यादीत संयुक्तरित्या टॉपला पोहचला आहे. याआधी इशान किशन याने भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये ३ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.  

या खास विक्रमालाही घातली गवसणी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातील दमदार खेळीसह संजू सॅमसन याने टी-२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पाही पार केला आहे. ५९ धावा करताच त्याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. आतापर्यंत रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा यांनी हा पल्ला गाठला होता. २८२ व्या टी-२० सामन्यात संजूनं या दिग्गजांच्या पक्तींत स्थान मिळवले आहे. 

असा पराक्रम करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला संजू

अर्धशतकाचे शतकात रुपांतर करताना त्याने ४७ चेंडूचा सामना केला. याआधी बांगलादेश विरुद्ध हैदराबादच्या टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर  आता डरबनच्या मैदानातही त्याने शतकी तोरा दाखवून दिला. या खेळीसह टी-२० क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक सेंच्युरी झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.  

Web Title: IND vs SA 1st T20I Sanju Samson Slams Back To Back Century And Set 3 Record In T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.