IND vs SA Live: जसप्रीत बुमराहचा 'चौकार', दक्षिण आफ्रिकेने कुटल्या ४०८ धावा, भारत 'पिछाडी'वर

India Vs South Africa 1st Test Live Updates In Marathi : मंगळवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:47 PM2023-12-28T17:47:29+5:302023-12-28T17:50:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st Test Day 3 Live Score Update south africa post 408, lead by 163 runs jasprit bumrah took 4 wickets | IND vs SA Live: जसप्रीत बुमराहचा 'चौकार', दक्षिण आफ्रिकेने कुटल्या ४०८ धावा, भारत 'पिछाडी'वर

IND vs SA Live: जसप्रीत बुमराहचा 'चौकार', दक्षिण आफ्रिकेने कुटल्या ४०८ धावा, भारत 'पिछाडी'वर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs South Africa 1st Test | सेंच्युरियन : तिसर्‍या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेला ४०८ धावांत गुंडाळले असून, यासह यजमानांनी भारतावर १६३ धावांची आघाडी घेतली आहे. आफ्रिकेकडून डीन एल्गारने सर्वाधिक १८५ धावा केल्या तर मार्को जान्सनने ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर मोहम्मद सिराजने (२) बळी घेऊन भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

सेंच्युरियनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाकडे ११ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आज यजमान संघाने स्फोटक खेळी करत ४०० पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने १०८.४ षटकांत सर्वबाद ४०८ धावा केल्या आणि यासह यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांवर संपला. टीम इंडियाकडून लोकेश राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी खेळली. तर, दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी घेतले.

हिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - 
टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर. 

Web Title: IND vs SA 1st Test Day 3 Live Score Update south africa post 408, lead by 163 runs jasprit bumrah took 4 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.