IND vs SA 1st Test Day 3 Live, Rishabh Pant Breaks MS Dhoni Record: भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. पण दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डाव त्यापेक्षाही झटपट गडगडला. मोहम्मद शमीच्या सहा बळींच्या जोरावर भारताने आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांतच गुंडाळला. या डावात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने विशेष कामगिरी तर केलीच, पण त्यासोबतच त्याने महेंद्रसिंग धोनीचा विक्रमही मोडीत काढला.
धोनीचा वारसदार म्हणून सध्या ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. पंतदेखील आपला खेळ दिवसेंदिवस चांगला करत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तशातच, पंतकडे आजच्या सामन्यात आपला आदर्श असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम मोडला. भारतीय संघाकडून यष्टीरक्षण करताना सर्वात जलद १०० गडी बाद करण्याचा बहुमान ऋषभ पंतने मिळवला. धोनीने आतापर्यंत सर्वात जलद ३६ सामन्यात बळींचं शतक पूर्ण केलं होतं. पण पंतने अवघ्या २६व्या कसोटीतच ही कामगिरी केली.
वुल्डरचा झेल घेत पूर्ण केलं शतक
ऋषभ पंतच्या नावे मालिका सुरू होण्याआधी यष्टीरक्षक म्हणून ९७ बळी होते. आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने आणखी चार झेल टिपत कसोटीतील आपलं बळींचं शतक पूर्ण केलं. आता पंतच्या नावे यष्टीरक्षक म्हणून १०१ गडी आहेत. त्यापैकी ९३ झेल आहेत तर ८ स्टंपिंग आहेत. आफ्रिकेच्या पहिल्या डावात पंतने कर्णधार एल्गर आणि टेंबा बावुमा यांचे झेल घेतले. त्याने विआन वुल्डरचा झेल टिपत त्याने शतक पूर्ण केलं. आणि अखेरीस रबाडाचे झेल घेत १०१वा बळी मिळवला.
आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना हा पंतचा २६वा कसोटी सामना होता. महेंद्रसिंग धोनीने ३६व्या कसोटी सामन्यात ही किमया केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद बळींचे शतक पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत पंत आणि धोनीनंतर वृद्धिमान साहा तिसरा (३७), किरण मोरे चौथे (३९), नयन मोंगिया पाचवे (४१) आणि सय्यद किरमाणी सहाव्या स्थानी (४२) आहेत.
Web Title: IND vs SA 1st Test Live Rishabh Pant fastest Indian wicket keeper 100 wickets breaks MS Dhoni Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.