IND vs SA 1st Test: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा झटका बसला. रोहित शर्मा पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल १७ आणि शुभमन गिल २ धावा करत बाद झाले. आता विराट कोहली आणि श्रेयस अय्यर भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
पहिल्या कसोटीत भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकदरम्यान सांगितले की, अष्टपैलू रवींद्र जडेजा पहिली कसोटी खेळत नाहीय. त्याच्या जागी आर अश्विनला संधी मिळाली आहे. जडेजा पहिली कसोटी न खेळण्याचे कारणही रोहितने सांगितले आहे. जडेजाच्या पाठीत दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या जागी अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. अश्विन चांगला फिरकीपटू आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहही खेळत आहेत. त्याचवेळी प्रसिद्ध कृष्णाने पदार्पण केले आहे.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.