IND vs SA 2nd ODI Live Updates : Pocket Dynamo तापला! इशान किशनने ११ चेंडूंत ५८ धावा चोपल्या, थोडक्यात हुकले शतक, Video

पॉकेट डायनामो इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५०+ धावा जोडताना भारताचा विजयाचा पाया मजबूत केला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 08:12 PM2022-10-09T20:12:47+5:302022-10-09T20:16:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd ODI Live Updates : A heartbreak for Ishan Kishan - dismissed for 93 in 84 balls 4 fours and 7 sixes, Video | IND vs SA 2nd ODI Live Updates : Pocket Dynamo तापला! इशान किशनने ११ चेंडूंत ५८ धावा चोपल्या, थोडक्यात हुकले शतक, Video

ishan kishan

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारताची सुरुवात काही खास झाली नाही. पहिल्या वन डेपेक्षा शिखर धवन व शुबमन गिल यांनी अधिक धावा केल्या, परंतु अपेक्षित कामगिरी करण्यात ते चूकले. वेन पार्नेलने गब्बरचा त्रिफळा उडवला, तर कागिसो रबाडाने अप्रतिम रिटर्न झेल टिपला. पण, पॉकेट डायनामो इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५०+ धावा जोडताना भारताचा विजयाचा पाया मजबूत केला.  

शिखर धवनचा त्रिफळा उडाला, शुबमन गिलचा अप्रतिम झेल कागिसो रबाडाने टिपला; Video 


क्विंटन डी कॉक ( ५) तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर भारताला सामन्यावर पकड घेता आली असती, परंतु यानेमन मलान ( २५) व रिझा हेंड्रिक्स यांनी डाव सावरला. पदार्पणवीर शाहबाज अहमदने ही ३३ धावांची भागीदारी तोडली. हेंड्रिक्स व एडन मार्कराम या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत १२९ धावा जोडल्या. हेंड्रिक्स ७६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७४ धावांवर माघारी परतला. हेनरिच क्लासेन ( ३०) व मार्कराम यांची ४६ धावांची भागीदारी कुलदीप यावदने संपुष्टात आणली. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने  ८९ चेंडूंत ७९ धावा ( ७ चौकार व १ षटकार) करणाऱ्या मार्करामला माघारी पाठवले. वेन पार्नेल व डेव्हिड मिलर यांनी झटपट ४१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने १६ धावा करणाऱ्या पार्नेलला बाद केले.  मिलरने ४९व्या षटकात दोन खणखणीत चौकार खेचले. सिराजने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहावे लागले. मिलर ३५ धावांवर नाबाद राहिला.
 

भारताचे सलामीवीर पुन्हा अपयशी ठरले. कर्णधार शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( २८) यांना अनुक्रमे वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांनी ४८ धावांवर माघारी पाठवले. इशान किशनश्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरताना ७० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. केशव महाराजच्या गोलंदाजीवर इशानने खणखणीत षटकार खेचून फलकावर तिहेरी आकडा चढवला. त्या षटकात इशानने दोन षटकार खेचले. इशान व श्रेयस या दोघांनी आपापले अर्धशतक अनुक्रमे ६० व ५० चेंडूंत पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. या दोघांच्या मजबूत फटकेबाजीमुळे भारताला २० षटकांत १०२ धावाच करायच्या होत्या आणि त्या सहज शक्य होत्या. 


८६ धावांवर असणाऱ्या इशानची रिटर्न कॅच रबाडाने टाकली. इशान आज शतक झळकावेल असेच वाटत होते, परंतु माशी शिकंली. बीजॉर्न फॉर्च्युनने त्याची विकेट घेतली. इशान ८४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावांवर माघारी परतला.  त्याने श्रेयससह १५५ चेंडूंत १६१ धावांची भागीदारी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SA 2nd ODI Live Updates : A heartbreak for Ishan Kishan - dismissed for 93 in 84 balls 4 fours and 7 sixes, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.