India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारताची सुरुवात काही खास झाली नाही. पहिल्या वन डेपेक्षा शिखर धवन व शुबमन गिल यांनी अधिक धावा केल्या, परंतु अपेक्षित कामगिरी करण्यात ते चूकले. इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. इशानने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयससह १५५ चेंडूंत १६१ धावांची भागीदारी केली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत तिसऱ्या विकेट्ससाठी सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड ( १५८ धावा) यांचा विक्रम मोडला. विराट कोहली व अजिंक्य रहाणे १८९ धावांसह अव्वल स्थानावर आहेत.
Pocket Dynamo तापला! इशान किशनने ११ चेंडूंत ५८ धावा चोपल्या, थोडक्यात हुकले शतक, Video
भारताचे सलामीवीर पुन्हा अपयशी ठरले. कर्णधार शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( २८) यांना अनुक्रमे वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांनी ४८ धावांवर माघारी पाठवले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरताना ७० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. केशव महाराजच्या गोलंदाजीवर इशानने खणखणीत षटकार खेचून फलकावर तिहेरी आकडा चढवला. त्या षटकात इशानने दोन षटकार खेचले. इशान व श्रेयस या दोघांनी आपापले अर्धशतक अनुक्रमे ६० व ५० चेंडूंत पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. या दोघांच्या मजबूत फटकेबाजीमुळे भारताला २० षटकांत १०२ धावाच करायच्या होत्या आणि त्या सहज शक्य होत्या.
८६ धावांवर असणाऱ्या इशानची रिटर्न कॅच रबाडाने टाकली. इशान आज शतक झळकावेल असेच वाटत होते, परंतु माशी शिकंली. बीजॉर्न फॉर्च्युनने त्याची विकेट घेतली. इशान ८४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावांवर माघारी परतला. इशानचे शतक हुकले असले तरी श्रेयसने ती उणीव भरून काढली. श्रेयसने १४ चौकारांच्या मदतीने १०३ चेंडूंत वन डेतील दुसरे शतक पूर्ण केले.