IND vs SA, 2nd ODI Live Updates : भारतीय संघानं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी घेतली; जाणून घ्या संघात काय बदल केले

India vs South Africa, 2nd ODI Live Updates :  कसोटी मालिकेत आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:37 PM2022-01-21T13:37:05+5:302022-01-21T13:37:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd ODI Live Updates : India have won the toss and they've decided to bat first, Same XI for India | IND vs SA, 2nd ODI Live Updates : भारतीय संघानं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी घेतली; जाणून घ्या संघात काय बदल केले

IND vs SA, 2nd ODI Live Updates : भारतीय संघानं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी घेतली; जाणून घ्या संघात काय बदल केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd ODI Live Updates :  कसोटी मालिकेत आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर तीन वन डे  सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत चांगल्या सुरुवातीनंतरही भारताने हातातल सामना गमावला. यजमान द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ०-१ असे पिछाडीवर पडल्यानंतर भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


पहिल्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि माजी कर्णधार विराट कोहली या अनुभवी फलंदाजांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी नांगी टाकली.  भारताच्या मधल्या फळीतील अपयश गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय ठरला आहे. शार्दूल ठाकूरनं नाबाद अर्धशतक झळकावून  भारताची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. अष्टपैलू म्हणून व्यंकटेशला पदार्पणाची संधी दिली खरी. मात्र, त्याला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या लढतीत संघात काय बदल होतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण, लोकेश राहुलनं पहिल्या वन डेतील संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल ( 2ND ODI. India XI: S Dhawan, K L Rahul (c), V Kohli, S Iyer, R Pant (wk), V Iyer, R Ashwin, S Thakur, B Kumar, J Bumrah, Y Chahal) 

Web Title: IND vs SA, 2nd ODI Live Updates : India have won the toss and they've decided to bat first, Same XI for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.