IND vs SA 2nd ODI Live Updates : भारताच्या दोन षटकांनी सामना फिरवला; रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करामने लढवलेला गड कोसळला 

India vs South Africa 2nd ODI Live Updates : क्विंटन डी कॉकला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवूनही भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात पकड घेता आली नव्हती.. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:13 PM2022-10-09T17:13:24+5:302022-10-09T17:19:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd ODI Live Updates : India need 279 to defeat South Africa in the 2nd ODI to level the series 1-1. | IND vs SA 2nd ODI Live Updates : भारताच्या दोन षटकांनी सामना फिरवला; रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करामने लढवलेला गड कोसळला 

IND vs SA 2nd ODI Live Updates : भारताच्या दोन षटकांनी सामना फिरवला; रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करामने लढवलेला गड कोसळला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd ODI Live Updates : क्विंटन डी कॉकला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवूनही भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात पकड घेता आली नाही. रिझा हेंड्रिक्स व एडन मार्कराम यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या आणि विक्रमी १२९ धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला फ्रंटसिटवर आणून बसवले होते. मात्र, कुलदीप यादववॉशिंग्टन सुंदर यांच्या सलग दोन षटकांनी चित्र पुन्हा बदलले. त्यानंतर डेव्हिड मिलरने संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मिलरवर कालच दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तरीही तो आज मैदानावर खेळायला उतरला.


क्विंटन डी कॉक ( ५) सिराजच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानेमन मलान व रिझा हेंड्रिक्स यांनी आफ्रिकेचा डाव सावरताना संयमी खेळी केली. पदार्पणवीर शाहबाजने ही ३३ धावांची भागीदारी तोडली आणि मलानला २५ धावांवर LBW केले. हेंड्रिक्स व एडन मार्कराम या दोघांनी आफ्रिकेची धावगती वाढवली. हेंड्रिक्सने ५८ चेंडूंत वन डे तील चौथे अर्धशतक पूर्ण केले. मार्करानेही ६० चेंडूंत त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण करताना हेंड्रिक्ससह तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत १२९ धावा जोडल्या. सिराजला ही जोडी तोडण्यात यश मिळालं. हेंड्रिक्स ७६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७४ धावांवर माघारी परतला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या शाहबाजने १० षटकांत ५४ धावांत १ विकेट घेतली. 

हेनरिच क्लासेन व मार्कराम यांची ४६ धावांची भागीदारी कुलदीप यावदने संपुष्टात आणली. क्लासेन २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून ३० धावांवर माघारी परतला. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. त्याने ८९ चेंडूंत ७९ धावा ( ७ चौकार व १ षटकार) करणाऱ्या मार्करामला माघारी पाठवले. या दोन षटकानंतर टीम इंडियाने पुनरागमन केले. वेन पार्नेल व डेव्हिड मिलर यांनी झटपट ४१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने १६ धावा करणाऱ्या पार्नेलला बाद केले. मिलरने ४९व्या षटकात दोन खणखणीत चौकार खेचले. सिराजने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहावे लागले. मिलर ३५ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SA 2nd ODI Live Updates : India need 279 to defeat South Africa in the 2nd ODI to level the series 1-1.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.