Join us  

IND vs SA 2nd ODI Live Updates : शिखर धवनचा त्रिफळा उडाला, शुबमन गिलचा अप्रतिम झेल कागिसो रबाडाने टिपला; Video 

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी मधली काही षटकं वगळली तर दुसऱ्या वन डे सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण, सलामीवीरांनी पुन्हा निराश केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 7:01 PM

Open in App

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी मधली काही षटकं वगळली तर दुसऱ्या वन डे सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj ) आजच्या सामन्यातील स्टार ठरला. त्याने ३८ धाव देताना ३ विकेट्स घेतल्या. अखेरच्या षटकात त्याने केवळ ३ धावा देताना दक्षिण आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहण्यास भाग पाडले. पण, भारताची सुरुवात काही खास झाली नाही. पहिल्या वन डेपेक्षा शिखर धवन व शुबमन गिल यांनी अधिक धावा केल्या, परंतु अपेक्षित कामगिरी करण्यात ते चूकले. वेन पार्नेलने गब्बरचा त्रिफळा उडवला, तर कागिसो रबाडाने अप्रतिम रिटर्न झेल टिपला. 

Mohammed Siraj चा रन आऊचा प्रयत्न चुकला, डेड बॉलची मागणी करू लागला; अम्पायरने झापला, Video 

क्विंटन डी कॉक ( ५) तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर भारताला सामन्यावर पकड घेता आली असती, परंतु यानेमन मलान ( २५) व रिझा हेंड्रिक्स यांनी डाव सावरला. पदार्पणवीर शाहबाज अहमदने ही ३३ धावांची भागीदारी तोडली. हेंड्रिक्स व एडन मार्कराम या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत १२९ धावा जोडल्या. हेंड्रिक्स ७६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७४ धावांवर माघारी परतला. हेनरिच क्लासेन ( ३०) व मार्कराम यांची ४६ धावांची भागीदारी कुलदीप यावदने संपुष्टात आणली. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने  ८९ चेंडूंत ७९ धावा ( ७ चौकार व १ षटकार) करणाऱ्या मार्करामला माघारी पाठवले. वेन पार्नेल व डेव्हिड मिलर यांनी झटपट ४१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने १६ धावा करणाऱ्या पार्नेलला बाद केले.  मिलरने ४९व्या षटकात दोन खणखणीत चौकार खेचले. सिराजने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. आफ्रिकेला ७ बाद २७८ धावांवर समाधानी राहावे लागले. मिलर ३५ धावांवर नाबाद राहिला.

भारताचे सलामीवीर पुन्हा अपयशी ठरले. कर्णधार शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( २८) यांना अनुक्रमे वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांनी ४८ धावांवर माघारी पाठवले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनशुभमन गिल
Open in App