India vs South Africa, 2nd ODI Live Updates : शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी दुसऱ्या वन डे सामन्यांत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पण बिनबाद ६३ वरून भारताची गाडी २ बाद ६४ अशी घसरली. विराट कोहली प्रथमच फिरकीपटूच्या गोलंदाजीवर शून्यावर माघारी परतला. त्यात आणखी एका विकेटची भर पडली असती, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संधी गमावली.
नेमकं काय झालं ते पाहूया... नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील लढतीत ७९ धावांची खेळी करणाऱ्या शिखरनं पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. लोकेशनंही त्याला चांगली साथ दिली. पण १२व्या षटकात एडन मार्करामनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली पुढच्याच षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर बाद झाला.
रिषभ पंत व लोकेश यांनी भारताचा डाव सावरला. पण, या जोडीतही गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. केशव महाराजनं टाकेलल्या १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभनं मिड विकेटच्या दिशेनं फटका मारला अन् तोपर्यंत लोकेश क्रिज सोडून रिषभच्या इथे पोहोचला होता. पण, रिषभ जागेवरून हलला नाही. दोन्ही फलंदाज एकाच एंडला असूनही आफ्रिकेला विकेट मिळवता आली नाही. टेम्बा बवुमानं फेकलेला चेंडू महाराजला पकडता आला नाही आणि त्यानं धावबाद करण्याची संधी गमावली. या दोघांनी आता अर्धशतकी भागीदारी केली आहे.
पाहा व्हिडीओ..