IND vs SA 2nd ODI : भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात फार काही खास कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. साई सुदर्शन व लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( ४) दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतल्यानंतर साई सुदर्शन व तिलक वर्मा यांनी काही काळ चांगला खेळ केला. तिलक ( १०) पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधार लोकेश राहुल व साई यांनी चांगली भागीदारी केली. साईने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ८३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६२ धावा केल्या. लोकेश खेळपट्टीवर उभा असताना दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन ( १२) व रिंकू सिंग ( १७) यांनी निराश केले.
लोकेश ६४ चेंडूंत ५६ धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंगने १८ धावा करून भारताला २११ धावांपर्यंत पोहोचवले. भारताचा संपूर्ण संघ ४६.२ षटकांत तंबूत परतला. नांद्रे बर्गरने तीन, ब्युरन हेंड्रिक्स व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.