Join us  

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या टॉसला ४० मिनिटं बाकी अन्...; BCCI चं ट्विट व्हायरल 

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना सेंट जॉर्ज पार्क येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 7:32 PM

Open in App

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना सेंट जॉर्ज पार्क येथे होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा संघ कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण, या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि आता भारतीय संघाकडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी केवळ ५ मॅच उरल्या आहेत. आजचा सामना भारतीय वेळेनुसार ८.३० वाजता सुरू होणार आहे, पण नाणेफेकीला ४० मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना BCCIच्या ट्विटने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. 

- भारतीय संघाने मागील चार ट्वेंटी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ विजय मिळवले आहेत, तर २ सामने ड्रॉ राहिले आहेत. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने ( २-०) भारताविरुद्ध शेवटची ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती.  - २०२३ मध्ये भारताकडून सर्वाधिक २५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान अर्शदीप सिंगने पटकावला आहे. जगातील गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर येतो.  - दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने ९९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत १०६ षटकार खेचले आहेत. त्याच्यापेक्षा एकाही आफ्रिकन खेळाडूला अधिक षटकार खेचता आलेले नाहीत.  दरम्यान, बीसीसीआयने ट्विट केले की, नाणेफेकीला ४० मिनिटे शिल्लक असताना पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हा सामना वेळेत सुरू होण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय