India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना ग्याबेखा येथे होत आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत भोपळ्यावर माघारी परतले. शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल यांना आफ्रिकन गोलंदाजांनी बाद केल्यानंतर टीम इंडियावर ७ वर्षांनी एक वेगळी नामुष्की ओढावली.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे, परंतु स्टार सलामीवीर आजारी पडल्याने आज खेळू शकणार नाही. त्यामुळे शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला आली. पण, मार्को यानसेनने पहिल्याच षटकात यशस्वीला ( ०) माघारी पाठवले. शुबमनही आज अपयशी ठरला आणि लिझाड विलियम्सनने भारताला दुसरा धक्का दिला. भारताचे दोन्ही सलामीवीर ६ धावांत माघारी परतले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर जाण्याची ही दुसरी वेळ ठरली. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाले होते.
तिलक वर्माला आज मोठी संधी होती आणि त्याने सुरूवातही तशी केली. त्याने मार्को यानसेनच्या एका षटकात १९ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादवनेही हळुहळू हात मोकळे केले. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताकडून २००० धावा पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला. विराट कोहली ( ४००८), रोहित शर्मा ( ३८५३) व लोकेश राहुल ( २२५६) यांनी हा टप्पा ओलांडला आहे. पण, सर्वात जलद २००० धावा करण्याच्या विराटच्या विक्रमाशी सूर्याने आज बरोबरी केली. बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ५२ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला होता