India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात लोकेश राहुल व रोहित शर्मा ( Rohit Sharma) या जोडीने आज कुणाचेच ऐकायचे नाही हा निर्धार केलेला दिसला. या दोघांनी भारताला पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) बॅट तळपली. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावांची फटकेबाजी करताना मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने १८ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले.
Rohit Sharma-लोकेश राहुल जोडी हिट ठरली, बाबर-रिझवानला पुरून उरली; मोठा विक्रम
रोहितचा हा ४०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि एवढे ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला. लोकेश व रोहित यांनी भारताच्या डावाची सकारात्मक सुरुवात केली. लोकेशने पहिलाच चेंडू चौकार खेचला, तर रोहितने दुसऱ्या षटकात स्कूप मारून चौकार कमावला. रोहितने आज चौकार मारून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात ५०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय कर्णधाराचा मान पटकावला. लोकेश-रोहित ही जोडी आज आफ्रिकेच्या गोलंदाजांवर भारी पडताना दिसली. रोहित उत्तुंग फटके मारत होता, तर लोकेशची तंत्रशुद्ध फलंदाजी चाहत्यांना खिळवणारी ठरली.
या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५७ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०+ धावांची भागीदारी करण्याचा विक्रम रोहित व लोकेशने आज नावावर केला. या दोघांनी १५ वेळा हा पराक्रम करताना पाकिस्तानच्या बाबर-रिझवान यांचा ( १४) विक्रम मोडला. १०व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर रोहितने मिडविकेटच्या दिशेने जोरदार फटका मारला, परंतु यावेळेस सीमारेषा पार करण्याआधीच तो त्रिस्तान स्टब्सने टिपला. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला अन् भारताला ९६ धावांवर पहिला धक्का बसला. लोकेशने २४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. महाराजने त्याच्या अखेरच्या षटकात लोकेशला LBW केले. लोकेशने २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा चोपल्या.
फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंत १००० धावा करण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला. त्याने भारतीयांमध्ये सर्वात कमी डावात हा टप्पा ओलांडण्याचा विक्रमात रोहितला मागे टाकले. त्याने ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA, 2nd T20I Live Updates :18 ball fifty for Suryakumar Yadav, he is the fastest in T20i history to reach 1,000 runs in terms of balls, break rohit sharma record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.