India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात लोकेश राहुल व रोहित शर्मा ( Rohit Sharma) या जोडीने आज कुणाचेच ऐकायचे नाही हा निर्धार केलेला दिसला. या दोघांनी भारताला पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) बॅट तळपली. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावांची फटकेबाजी करताना मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने १८ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले.
Rohit Sharma-लोकेश राहुल जोडी हिट ठरली, बाबर-रिझवानला पुरून उरली; मोठा विक्रम
या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५७ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०+ धावांची भागीदारी करण्याचा विक्रम रोहित व लोकेशने आज नावावर केला. या दोघांनी १५ वेळा हा पराक्रम करताना पाकिस्तानच्या बाबर-रिझवान यांचा ( १४) विक्रम मोडला. १०व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर रोहितने मिडविकेटच्या दिशेने जोरदार फटका मारला, परंतु यावेळेस सीमारेषा पार करण्याआधीच तो त्रिस्तान स्टब्सने टिपला. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला अन् भारताला ९६ धावांवर पहिला धक्का बसला. लोकेशने २४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. महाराजने त्याच्या अखेरच्या षटकात लोकेशला LBW केले. लोकेशने २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा चोपल्या.
फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंत १००० धावा करण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला. त्याने भारतीयांमध्ये सर्वात कमी डावात हा टप्पा ओलांडण्याचा विक्रमात रोहितला मागे टाकले. त्याने ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"